TRENDING:

बँकेपासून ते PM Kisan पर्यंत! आजपासून शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय? A TO Z माहिती

Last Updated:

Farmer New Rules : नवीन वर्ष सुरू होताच केंद्र सरकार आणि बँकिंग व्यवस्थेशी संबंधित काही महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Farmer New Rules
Farmer New Rules
advertisement

मुंबई : नवीन वर्ष सुरू होताच केंद्र सरकार आणि बँकिंग व्यवस्थेशी संबंधित काही महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. याचा थेट परिणाम शेतकरी वर्गावर होणार असून, वेळेत आवश्यक कामे पूर्ण न केल्यास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. विशेषतः पीएम किसान सन्मान निधी, बँकिंग व्यवहार, कर्ज, अनुदान आणि डिजिटल पेमेंट यावर या बदलांचा मोठा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे नियम समजून घेऊन तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे.

advertisement

पॅन-आधार लिंक नसेल तर अडचणीत शेतकरी

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही, त्यांचे पॅन कार्ड 1 जानेवारीपासून निष्क्रिय झाले आहे. पॅन निष्क्रिय झाल्यास बँकेत नवीन खाते उघडता येणार नाही, मोठे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत आणि आयटी रिटर्न भरणेही अशक्य होईल. अनेक शेतकरी आता शेतीसाठी कर्ज, अनुदान किंवा शासकीय योजनांचा लाभ घेतात. अशा वेळी पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास कर्ज प्रक्रिया थांबू शकते. त्यामुळे आधार-पॅन लिंक करणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे.

advertisement

पीएम किसानसाठी ‘डिजिटल फार्मर आयडी’ अनिवार्य

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. मात्र आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘डिजिटल फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात येत आहे. हा आयडी नसेल तर पुढील हप्ता थांबवला जाऊ शकतो. अनेक शेतकरी या आयडीबाबत अजूनही अनभिज्ञ आहेत. कृषी विभाग, सेवा केंद्र किंवा तालुका स्तरावर हा आयडी तयार करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागू शकते.

advertisement

डिजिटल व्यवहार करताना अधिक सावधगिरी आवश्यक

आजकाल शेतमाल विक्री, खत-बियाणे खरेदी, अनुदानाचे पैसे मिळणे हे सगळे व्यवहार डिजिटल पद्धतीने होतात. मात्र आता ऑनलाइन व्यवहारांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ अधिक कडक करण्यात आले आहे. म्हणजेच ओटीपी, बायोमेट्रिक किंवा अतिरिक्त पडताळणी करावी लागणार आहे. ही प्रक्रिया थोडी किचकट असली तरी फसवणूक टाळण्यासाठी ती महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक अपडेट ठेवणे आणि कोणालाही ओटीपी सांगू नये, हे लक्षात ठेवावे.

advertisement

बँकिंग आणि कर्जावर होणार परिणाम

एसबीआय, एचडीएफसी, पीएनबी यांसारख्या मोठ्या बँका मुदत ठेवी (FD) आणि कर्जाच्या व्याजदरात बदल करण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या पीक कर्ज, ट्रॅक्टर कर्ज आणि गृहकर्जावर होऊ शकतो. व्याजदर वाढल्यास कर्जाचा हप्ता वाढेल, तर एफडीवरील व्याजदर बदलल्यास शेतकऱ्यांच्या बचतीवर परिणाम होईल.

शेतकऱ्यांसाठी आवाहन

नवीन नियमांमुळे शेतकऱ्यांनी निष्काळजीपणा टाळणे आवश्यक आहे.

पॅन-आधार लिंक तात्काळ तपासा. 

डिजिटल फार्मर आयडी तयार करून घ्या. 

बँक व्यवहार करताना अधिक सतर्क रहा. 

कर्ज व एफडीचे दर तपासून आर्थिक नियोजन करा. 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस आणि सोयाबीन दरात पुन्हा वाढ, तुरीला काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
बँकेपासून ते PM Kisan पर्यंत! आजपासून शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय? A TO Z माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल