TRENDING:

काही होत नाही! म्हणून काळी बुरशी आलेला कांदा पुसून धुवून जेवणात वापरताय का? एक्स्पर्टने सांगितले त्यामागचे गंभीर परिणाम

Last Updated:

Onion Black Fungus : सध्या बाजारात तसेच घरगुती साठवणुकीत कांद्यावर काळी बुरशी दिसून येण्याचे प्रमाण वाढले आहे. ही काळी बुरशी केवळ कांद्याची गुणवत्ता खराब करत नाही, तर मानवी आरोग्यासाठीही गंभीर धोका ठरू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
onion black mold
onion black mold
advertisement

मुंबई : सध्या बाजारात तसेच घरगुती साठवणुकीत कांद्यावर काळी बुरशी दिसून येण्याचे प्रमाण वाढले आहे. ही काळी बुरशी केवळ कांद्याची गुणवत्ता खराब करत नाही, तर मानवी आरोग्यासाठीही गंभीर धोका ठरू शकते, असा इशारा आरोग्य व अन्नतज्ज्ञांकडून दिला जात आहे. अनेक वेळा बुरशीचा थर काढून कांदा वापरण्याची चूक केली जाते, मात्र असे करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

advertisement

कांद्याची साठवणूक ओलसर ठिकाणी झाल्यास, किंवा कांद्याला जखम असल्यास बुरशी सहज पसरते. सुरुवातीला कांद्याच्या सालीवर काळसर डाग दिसतात, परंतु कालांतराने ही बुरशी आतल्या गरात शिरते आणि संपूर्ण कांदा दूषित करते.

काय परिणाम होतात?

आरोग्याच्या दृष्टीने काळी बुरशी अत्यंत धोकादायक ठरू शकते. या बुरशीमुळे मायकोटॉक्सिन्स नावाचे विषारी घटक तयार होतात. हे घटक शरीरात गेल्यास पोटदुखी, मळमळ, उलटी, अतिसार यांसारखे तात्काळ त्रास होऊ शकतात. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींमध्ये याचा परिणाम अधिक गंभीर स्वरूपाचा दिसून येतो. काही प्रकरणांत श्वसनमार्गाचे विकार, घशाला खवखव, खोकला किंवा अ‍ॅलर्जीची लक्षणेही आढळतात.

advertisement

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ बुरशीग्रस्त कांदा खाल्ल्यास यकृत आणि मूत्रपिंडांवर परिणाम होण्याचा धोका वाढतो. काही मायकोटॉक्सिन्स शरीरात साठून राहू शकतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी करू शकतात. त्यामुळे संसर्गजन्य आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते. अन्नसुरक्षेच्या दृष्टीनेही हा विषय गंभीर मानला जात आहे.

advertisement

काही गृहिणी किंवा ग्राहक काळी बुरशी लागलेला भाग कापून उरलेला कांदा वापरतात. मात्र, अन्नतज्ज्ञ सांगतात की बुरशीचे धागे डोळ्यांना न दिसता संपूर्ण कांद्यात पसरलेले असू शकतात. त्यामुळे फक्त वरचा भाग काढून कांदा वापरणे सुरक्षित नाही. अशा कांद्याचा वापर केल्यास विषारी घटक शरीरात जाण्याचा धोका कायम राहतो.

काळी बुरशी का येते?

advertisement

कांद्यावरील काळी बुरशी प्रामुख्याने अ‍ॅस्परजिलस नायगर (Aspergillus niger) या बुरशीमुळे होते. ही बुरशी प्रामुख्याने जास्त आर्द्रता, उष्ण तापमान आणि अपुरी हवा खेळती राहिल्यास झपाट्याने वाढते. काढणीनंतर कांदा योग्यरीत्या वाळवला नाही, साठवणूक गृहात ओलावा राहिला किंवा कांद्याला जखम झाली असल्यास काळी बुरशी लागण्याचा धोका अधिक वाढतो. सुरुवातीला कांद्याच्या सालीवर काळसर डाग दिसतात. हळूहळू ही बुरशी कांद्याच्या आतपर्यंत पसरते आणि कांदा मऊ होऊन कुजण्यास सुरुवात होते.

काय काळजी घ्यावी?

काळी बुरशी दिसलेला कांदा पूर्णपणे टाकून द्यावा. कांद्याची साठवणूक नेहमी कोरड्या, हवेशीर आणि थंड ठिकाणी करावी. ओलसर किंवा कुजलेले कांदे इतर कांद्यांपासून वेगळे ठेवावेत, अन्यथा बुरशी वेगाने पसरू शकते. बाजारातून कांदा खरेदी करताना डाग, ओलावा किंवा दुर्गंधी असलेले कांदे टाळावेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात शरिराला आरोग्यदायी, घरीच बनवा केळफुलाची भाजी, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
काही होत नाही! म्हणून काळी बुरशी आलेला कांदा पुसून धुवून जेवणात वापरताय का? एक्स्पर्टने सांगितले त्यामागचे गंभीर परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल