TRENDING:

Numerology: सूर्यग्रहणाचा 4 मूलांकांना तोटा नव्हे खूपच फायदा; भाग्याची साथ कशी? दैनिक अंकज्योतिष

Last Updated:

Daily Numerology : ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्या मते, आज 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे वर्षातील पहिले सूर्यग्रहण 1, 2, 5 आणि 8 अंक असलेल्यांसाठी खूप शुभ आहे, विशेषतः पैसा, बुद्धिमत्ता आणि सकारात्मक परिणामांशी संबंधित बाबींमध्ये. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ, फायदेशीर गुंतवणूक आणि स्मार्ट आर्थिक नियोजन अनुभवायला मिळेल. तथापि, भविष्यातील ताण टाळण्यासाठी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. मूलांक 1 ते 9 सर्वांसाठी आजचे अंकशास्त्र सविस्तर वाचा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अंक 1 (कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेले लोक)
News18
News18
advertisement

मूलांक 1 असणाऱ्यांसाठी आजचा काळ खूपच छान आहे. आज अचानक कुठूनतरी धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यात आज एक प्रकारचा गोडवा असेल, ज्यामुळे आजूबाजूचे लोक तुमच्यावर प्रभावित होतील. जमेल तितका फक्त गरजेनुसारच खर्च करा, नाहीतर भविष्यात आर्थिक ओढाताण होऊ शकते. सरकारी अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील. आज फक्त आपल्या आई-वडिलांशी नाते जपण्याचा प्रयत्न करा.

advertisement

अंक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)

आज तुम्ही थोडे हळवे किंवा भावूक असाल, कारण कुटुंबाकडून तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल. आईच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडून येईल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस सर्वार्थाने उत्तम आहे. तुमचं मनोबल वाढवण्यासाठी आज भगवान शंकराला आवर्जून जल अर्पण करा.

अंक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोक)

advertisement

तुमच्यासाठी आजचा दिवस तसा बरा असेल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक सहलीचा बेत तुम्ही आखू शकता. आज कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करणं टाळा. तुमच्या ज्ञानी गोष्टींमुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा - गरज असेल तरच कोणाला सल्ला द्या. आज विष्णू देव आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा केल्यास चमत्कारिक फायदे मिळू शकतात.

advertisement

अंक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)

आज नशिबाची साथ तुम्हाला थोडी कमी मिळेल. कोणतंही काम करताना ते नीट तपासून मगच करा, अन्यथा आर्थिक अडचणीत अडकू शकता. आईच्या प्रकृतीची चिंता आज तुम्हाला सतावू शकते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि वेळेत तपासणी करून घ्या. कामाच्या ठिकाणी तुमची बुद्धी नेहमीपेक्षा थोडी कमी चालेल, ज्यामुळे कामाचा प्रभाव कमी पडू शकतो. राजकारणाशी संबंधित असाल तर सावध राहा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करू शकतं.

advertisement

अंक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक)

तुमच्यासाठी आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असेल. तुमची बुद्धिमत्ता आज चमकून दिसेल, ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठराल. पैसे कमवण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे, त्यामुळे काही नवीन मार्गांचा तुम्ही विचार करू शकता. स्वतःच्या बुद्धीवर तुमचा पूर्ण विश्वास असेल आणि कामात काही नवीन पद्धतींचा अवलंब तुम्ही करू शकाल.

जाणार एकदाची पिडा! 30 वर्षांनी शनिचा मेष राशीत प्रवेश, या राशींची साडेसाती सुटली

अंक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)

आज जोडीदाराशी प्रेमाने वागा. आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा छातीशी संबंधित तक्रारींमुळे दिवसभर त्रास होऊ शकतो. आज एखादी स्त्री तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी मदत करेल. जर तुम्हाला एखादं नवीन काम सुरू करायचं असेल, तर आज केलेली सुरुवात तुम्हाला पूर्ण फळ देईल.

अंक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक)

आजचा दिवस थोडा त्रासाचा जाऊ शकतो. एखाद्या आर्थिक समस्येमुळे तुम्ही दिवसभर चिंतेत असाल. कुटुंबात पत्नीच्या एखाद्या बोलण्यामुळे तुमचं मन दुखावलं जाऊ शकतं आणि तुम्हाला थोडं असहाय्य वाटेल. जोडीदाराशी वाद घातल्यास कामात अडथळे येतील. आज आई आणि पत्नीमध्येही खटके उडण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज घरी तांदळाची खीर बनवून सर्व सदस्यांसोबत मिळून खाण्याचा सल्ला दिला जातो.

अंक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेले लोक)

तुमच्यासाठी आज नशीब पूर्णपणे साथ देणारं आहे. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस अतिशय उत्तम असून जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला दुप्पट परतावा मिळताना दिसत आहे. आज पैशांची अजिबात कमतरता भासणार नाही. मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप आनंदी असाल, ज्यामुळे कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. जोडीदाराशी प्रेमाने वागणं तुमच्या फायद्याचं ठरेल.

महाशिवरात्रीपासून 4 राशींचा भाग्याचा काळ सुरू! कुंभसहित या राशींचे नशीब चमकणार

अंक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

तुमचा आजचा दिवस ठीक असेल. आज आपल्या रागावर पूर्ण ताबा ठेवणं गरजेचं आहे. पैशांचा ओघ नेहमीपेक्षा चांगला राहील. मालमत्तेच्या संदर्भात आज तुम्ही भावांशी चर्चा करू शकता. कोणतंही काम घाईघाईत करू नका, अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं काम करताना भावांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: सूर्यग्रहणाचा 4 मूलांकांना तोटा नव्हे खूपच फायदा; भाग्याची साथ कशी? दैनिक अंकज्योतिष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल