TRENDING:

Numerology: भाग्याचा दिवस उजाडणार! मंगळवारी 3 मूलांकाना डबल खुशखबर; 1 ते 9 दैनिक अंकशास्त्र

Last Updated:

Numerology Marathi: आज मंगळवारचा दिवस बहुतेक मूलांकांसाठी प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. अचानक धनलाभ, अडकलेले पैसे परत मिळणे आणि फायदेशीर गुंतवणूक होण्याचे योग आहेत. मूलांक 1 आणि 7 च्या लोकांसाठी व्यवसायात मोठे यश दिसत आहे. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले सर्व मूलांकाचे दैनिक अंकशास्त्र जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

आजचा दिवस तुमच्यासाठी एकदम कडक आहे. धनलाभाचे योग आहेत आणि व्यवसायात प्रगती होईल. समाजात तुमचं नाव आणि मानमरातब वाढेल. भावांसोबत काही चर्चा झाली तर डोकं शांत ठेवा. रागाच्या भरात काही वाईट बोलू नका, नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकतं.

मूलांक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)

advertisement

आज तुम्ही दिवसभर स्वतःच्याच विचारात राहाल. पैशांची काही मोठी अडचण येणार नाही आणि अडकलेले पैसे अचानक मिळू शकतात. पण, रागामुळे तुमचा बीपी वाढण्याची शक्यता आहे. थोडा धीर धरला तर सगळं व्यवस्थित होईल. शंकराची पूजा करणं तुमच्यासाठी शुभ ठरेल.

मूलांक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोक)

तुमचा आजचा दिवस साधा-सुधा राहील. आज कोणालाही फुकटचे सल्ले द्यायला जाऊ नका, नाहीतर शेवटी तुम्हीच चुकीचे ठराल. तुमचे स्पर्धक आज तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. बाहेर पडताना बायकोच्या हातनं हळदीचा टिळा लावून बाहेर पडलात तर फायदा होईल.

advertisement

मूलांक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)

आजचा दिवस थोडा चिंतेचा असेल. अचानक दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जपून राहा. मन आणि डोकं थोडं विचलित राहील. जर आज एखादा मोठा किंवा खास निर्णय घ्यायचा असेल, तर तो आज नका घेऊ, उद्यावर ढकला. घरात एखादी पूजा मांडली तर मनाला शांती मिळेल.

advertisement

माणसाला नरकाच्या दाराशी नेणाऱ्या 3 गोष्टी; श्रीकृष्णाने भगवद् गीतेत सांगितलंय..

मूलांक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक)

आज नशीब तुमच्या सोबत आहे. जे काही ठरवलं असेल, ते आज पूर्ण होईल. फक्त आपल्या रागावर लगाम ठेवा. घरच्यांसोबत छान वेळ घालवाल. पण, जोडीदाराच्या तब्येतीची अचानक तक्रार उद्भवू शकते, त्याकडे लक्ष द्या.

advertisement

मूलांक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)

तुमचा दिवस आज सामान्य राहील. धंद्याशी संबंधित थोडी चिंता सतावू शकते. ऑफिसमध्ये लोक तुम्हाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही संयम सोडू नका. आज आपल्या बहिणीला किंवा मुलीला एखादी भेटवस्तू द्या, तुम्हाला चांगलं फळ मिळेल.

मूलांक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक)

आज कामात अडथळे येऊ शकतात. शरीराला दुखापत होण्याची भीती आहे, त्यामुळे गाडी जपून चालवा. रक्ताशी संबंधित काही त्रास असेल तर काळजी घ्या. येणारे पैसे कुठेतरी अडकू शकतात. जोडीदारासोबत प्रवासाचे योग आहेत. घरात प्रेमाचं वातावरण टिकवून ठेवा.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोणाला काय? मेष ते मीन साप्ताहिक राशीभविष्य

मूलांक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 and 26 तारखेला जन्मलेले लोक)

आज तुम्हाला कामात खूप अडथळे येतील. दिवसाची सुरुवात चांगली होईल, पण संध्याकाळ होता होता चिंता वाढतील. आज अंगात खूप आळस जाणवेल. हा आळस घालवण्यासाठी सकाळी योग किंवा ध्यान करा, म्हणजे फ्रेश वाटेल. तुमच्या सुस्त स्वभावामुळे घरचे तुमच्यावर चिडू शकतात.

मूलांक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata ची टँकसारखी EV, Toyota च्या धाकड SUV ला देते टक्कर, रेंजमध्ये कोण बेस्ट?
सर्व पहा

तुमच्यासाठी काळ खूप चांगला आहे. खूप दिवसांपासून मनात असलेलं एखादं शुभ काम आज सुरू करण्याचा विचार करू शकता. लोकांची मदत करा आणि उदार राहा. देवी आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील. उपाय म्हणून आज दुर्गा देवीला गोड विडा अर्पण करा, नक्कीच फायदा होईल.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: भाग्याचा दिवस उजाडणार! मंगळवारी 3 मूलांकाना डबल खुशखबर; 1 ते 9 दैनिक अंकशास्त्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल