मुंबई : हिंदू धर्मात विजयादशमी किंवा दसरा हा सण विशेष महत्वाचा मानला जातो. तो वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय दर्शवतो. दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला हा सण साजरा केला जातो. यंदा दसरा २ ऑक्टोबर २०२५ रोजी, गुरुवारी येत आहे. पारंपरिक रितीरिवाजांनुसार या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून अन्यायाचा अंत केला होता, म्हणून या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. देशभरात रावण दहनाच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातो.
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसारही अत्यंत शुभ मानला जातो. ग्रह-नक्षत्रांच्या विशेष संयोगामुळे काही राशींवर यंदा दसऱ्याचा प्रभाव विशेष ठरणार आहे. ज्योतिषांच्या मते या वेळी रवि योग, सुकर्मा योग आणि धृति योग असे तीन शुभ योग एकत्र जुळून येणार आहेत. एवढेच नव्हे तर दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी बुध आणि मंगळ युती होणार आहे. या बदलांमुळे काही राशींना करिअर, नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतील.
मेष राशी
मेष राशीसाठी यंदाचा दसरा अत्यंत फलदायी ठरणार आहे. नोकरी व व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. बराच काळ प्रलंबित राहिलेली कामे या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. मेहनतीला योग्य यश मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण निर्माण होईल तसेच सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
कर्क राशी
कर्क राशीच्या जातकांसाठी विजयादशमी हा दिवस अत्यंत विशेष ठरणार आहे. करिअरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. कामात मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल आणि नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम मानला जात आहे. कौटुंबिक जीवनातही समाधान आणि सौहार्द अनुभवता येईल.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी दसरा भाग्यवर्धक ठरेल. करिअरमध्ये स्थैर्य आणि प्रगतीची नवी दारे खुलतील. बराच काळ अडकलेली कामे पूर्ण होऊन दिलासा मिळेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील आणि त्या यशस्वीरीत्या पार पाडता येतील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. वैवाहिक नात्यात अधिक जवळीक आणि मजबुती येईल.
दरम्यान, यंदाचा दसरा ग्रहयोगांच्या संयोगामुळे खास ठरत असून, अनेक राशींसाठी आनंद, प्रगती आणि समाधान घेऊन येणार आहे. धर्म, श्रद्धा आणि संस्कृतीच्या जोडीला या दिवसाचा ज्योतिषशास्त्रीय परिणामही जीवनाला सकारात्मक दिशा देणारा ठरण्याची शक्यता आहे. विजयादशमीचा हा उत्सव त्यामुळे धार्मिकच नव्हे तर आत्मिक आणि व्यावहारिक उन्नतीचाही संदेश देणारा आहे.
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)