TRENDING:

अरे बापरे! ३ मार्चला चंद्रग्रहण, ३ राशींच्या जीवनात घडणार मोठी उलथापालथ, प्रचंड नुकसान होणार, काय काळजी घ्याल?

Last Updated:

Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार, विश्वातील ग्रह-ताऱ्यांच्या सतत होणाऱ्या हालचालींचा मानवी जीवनावर सूक्ष्म पण खोल परिणाम होत असतो. या खगोलीय घडामोडी केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठीही महत्त्वाच्या मानल्या जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, विश्वातील ग्रह-ताऱ्यांच्या सतत होणाऱ्या हालचालींचा मानवी जीवनावर सूक्ष्म पण खोल परिणाम होत असतो. या खगोलीय घडामोडी केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठीही महत्त्वाच्या मानल्या जातात. 2026 हे वर्ष अशाच एका महत्त्वाच्या खगोलीय घटनेमुळे विशेष ठरणार आहे. वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी होणार असून, या ग्रहणामुळे अनेक राशींच्या जीवनात बदल, तणाव तसेच आत्मपरीक्षणाची वेळ येऊ शकते. या चंद्रग्रहणाची वेळ, सुतक कालावधी, संभाव्य परिणाम आणि आवश्यक काळजी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
chandragrahan 2026
chandragrahan 2026
advertisement

अनेक राशींसाठी निर्णायक ठरणारे चंद्रग्रहण

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहण ही केवळ आकाशातील घटना नसून ती मन, भावना आणि निर्णयक्षमतेवर परिणाम घडवणारी मानली जाते. विशेषतः जेव्हा ग्रहण एखाद्या राशीत किंवा महत्त्वाच्या नक्षत्रात घडते, तेव्हा त्याचे परिणाम अधिक तीव्र होऊ शकतात. 3 मार्च 2026 रोजी होणारे हे पूर्ण चंद्रग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होणार आहे. या काळात काही राशींना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.

advertisement

चंद्रग्रहण वेळ आणि कालावधी

या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे 3 तास 27 मिनिटांचा असेल.

सुरुवात : दुपारी 3.20 वाजता

समाप्ती : संध्याकाळी 6.46 वाजता

हे ग्रहण भारताच्या काही भागांत दिसण्याची शक्यता असून, त्याचबरोबर पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि प्रशांत महासागरातील काही प्रदेशांतही ते स्पष्टपणे दिसेल.

कोणत्या राशींवर होणार परिणाम?

सिंह

ग्रहण थेट स्वतःच्या राशीत होत असल्याने सिंह राशीच्या लोकांवर त्याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वरिष्ठांशी मतभेद, निर्णयांमध्ये गोंधळ आणि आत्मविश्वासात घट जाणवू शकते. डोकेदुखी, डोळ्यांशी संबंधित तक्रारी किंवा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते.

advertisement

वृश्चिक

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि वैयक्तिक पातळीवर सावध राहण्याचा इशारा दिला जात आहे.अडकलेले व्यवहार अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात, अचानक खर्च वाढू शकतो.विरोधक किंवा लपलेले शत्रू प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न करू शकतात. जोडीदाराशी संवाद जपून ठेवा. पचनसंस्थेच्या तक्रारी किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

मीन

मीन राशीच्या लोकांना या काळात मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. मेहनतीचे फळ उशिरा मिळेल, कामाचा ताण वाढू शकतो. प्रवासात काळजी घ्या, अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका. तसेच झोप न लागणे, अस्वस्थता किंवा चिंता वाढू शकते.

advertisement

सुतक काळात कोणती काळजी घ्यावी?

चंद्रग्रहणाचा सुतक काळ ग्रहण सुरू होण्याच्या सुमारे 9 तास आधी सुरू होतो. या काळात नकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावी असल्याचे मानले जाते. त्यामुळे धार्मिक विधी टाळणे, मन शांत ठेवणे, ध्यान किंवा जप करणे आणि महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलणे हितावह ठरू शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
अरे बापरे! ३ मार्चला चंद्रग्रहण, ३ राशींच्या जीवनात घडणार मोठी उलथापालथ, प्रचंड नुकसान होणार, काय काळजी घ्याल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल