पितृपक्ष आणि चंद्रग्रहण एकत्र
भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी होणारे हे ग्रहण भारतात स्पष्टपणे दिसणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी पितृपक्षाची सुरुवात होत असल्याने धार्मिक दृष्टिकोनातून याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रहणाची सुरुवात रात्री 9:58 वाजता होऊन त्याचा शेवट पहाटे 1:26 वाजता होईल. या काळात सुतक लागू राहील. त्यामुळे मंदिरातील पूजा, धार्मिक कार्ये आणि शुभ समारंभ यांना मनाई असेल.
advertisement
कर्क राशी
कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने या राशीवर चंद्रग्रहणाचा थेट परिणाम होईल. ग्रहणामुळे मानसिक अस्थिरता वाढू शकते. अनावश्यक चिंता, तणाव आणि नातेसंबंधात दुरावा येण्याची शक्यता आहे. तसेच, आरोग्याच्या किरकोळ समस्यांकडेही दुर्लक्ष करू नये. या काळात मन शांत ठेवणे आणि निर्णय घेताना संयम बाळगणे आवश्यक आहे.
कन्या राशी
या राशीच्या सहाव्या भावात ग्रहण होत असल्याने कामकाज आणि करिअरमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. नोकरी-व्यवसायातील मोठे निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल. आरोग्याच्या बाबतीतही काही समस्या उद्भवू शकतात. पैसा आणि नातेसंबंध हाताळताना सावधगिरी बाळगावी. ग्रहणाचा काळ आत्मपरीक्षण आणि संयमासाठी योग्य मानला जातो.
कुंभ राशी
कुंभ राशीतच हे पूर्ण चंद्रग्रहण होत असल्याने या राशीच्या व्यक्तींनी विशेष खबरदारी घ्यावी. आरोग्याच्या समस्या, थकवा आणि मानसिक तणाव जाणवू शकतो. कौटुंबिक आणि वैवाहिक नातेसंबंधांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात वाद-विवाद टाळावेत आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे लक्ष द्यावे.
मीन राशी
चंद्रग्रहण मीन राशीच्या बाराव्या भावात होत असल्याने अनपेक्षित खर्च वाढू शकतात. वैद्यकीय खर्च किंवा प्रवासाशी संबंधित खर्च करण्याची वेळ येऊ शकते. मानसिक अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत दक्ष राहावे आणि नातेसंबंधांमध्ये संयम दाखवावा.
दरम्यान, 7 सप्टेंबर रोजी होणारे हे पूर्ण चंद्रग्रहण ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. कर्क, कन्या, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रहणकाळात संयम, साधना आणि शांत मनाने परिस्थितीला सामोरे जाणे हेच योग्य ठरेल.
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)