TRENDING:

१८ ते २६ मार्चदरम्यान ४ राशींचा भाग्योदय होणार! ग्रहांचा 'द्विगुरु योग', हाती बक्कळ पैसा येणार, सुख शांती लाभणार

Last Updated:

Today Horoscope : आयुष्यात अनेकदा प्रचंड मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही. परंतु नशीबाची साथ मिळाल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयुष्यात अनेकदा प्रचंड मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही. परंतु नशीबाची साथ मिळाल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या जीवनातील चांगले-वाईट काळ ग्रहांच्या हालचालींशी संबंधित असतात. ग्रहांची स्थिती अनुकूल झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम जीवनाच्या विविध क्षेत्रांवर दिसून येतो.
Astrology News
Astrology News
advertisement

असाच एक महत्त्वाचा आणि शुभ मानला जाणारा योग १८ मार्च २०२६ पासून तयार होत आहे. ज्योतिषांच्या मते, या काळात शुक्र आणि गुरु यांच्यात ‘केंद्र दृष्टी योग’ निर्माण होत आहे. हा योग अत्यंत सकारात्मक मानला जातो. या योगाचा प्रभाव अनेक राशींवर जाणवणार असला तरी काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. याबाबत ज्योतिषतज्ज्ञ डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी माहिती दिली आहे.

advertisement

गुरु-शुक्र संयोगाचे ज्योतिषातील महत्त्व

ज्योतिषशास्त्रात गुरु (देवगुरु बृहस्पती) आणि शुक्र (दैत्यगुरु शुक्राचार्य) हे दोन्ही अत्यंत शुभ ग्रह मानले जातात. जेव्हा हे दोन ग्रह एकाच राशीत येतात किंवा एकमेकांवर दृष्टी टाकतात, तेव्हा ‘द्विगुरु योग’ किंवा ‘गुरु-शुक्र संयोग’ तयार होतो.

गुरु हा ज्ञान, भाग्य, विस्तार आणि आध्यात्मिक प्रगतीचा कारक मानला जातो, तर शुक्र हा सुख, ऐश्वर्य, कला आणि संपन्नतेचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे या दोन्ही ग्रहांचा सकारात्मक संयोग जीवनात प्रगती, आर्थिक वाढ आणि सौभाग्याचे संकेत देतो.

advertisement

१८ मार्चपासून तयार होणारा ‘केंद्र दृष्टी योग’

१८ मार्च २०२६ पासून गुरु आणि शुक्र एकमेकांच्या केंद्रस्थानी येत असल्याने केंद्र दृष्टी योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, दोन शुभ ग्रह जेव्हा केंद्रस्थानातून एकमेकांवर दृष्टी ठेवतात तेव्हा त्याचा प्रभाव अत्यंत लाभदायक ठरतो.

योगाचा प्रभाव किती काळ राहणार?

हा योग विशेषतः मार्च महिन्याच्या उत्तरार्धात प्रभावी राहणार आहे. २६ मार्च २०२६ रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करेपर्यंत या संयोगाचा सकारात्मक प्रभाव अनेक राशींवर जाणवू शकतो.

advertisement

चतुर्ग्रही योगामुळे वाढले महत्त्व

या कालावधीत आणखी एक विशेष ग्रहयोग तयार होत आहे. १५ मार्चच्या सुमारास सूर्य मीन राशीत प्रवेश करत असल्याने तिथे आधीपासून असलेल्या गुरु आणि इतर ग्रहांच्या संयोगामुळे गुरु-आदित्य योग आणि चतुर्ग्रही योग निर्माण होत आहे. त्यामुळे हा काळ ज्योतिषीय दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.

मेष रास

advertisement

आ उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

नोकरीत बढती मिळण्याची शक्यता असून व्यवसायातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

दीर्घकाळ त्रास देणाऱ्या काही आजारांपासून आराम मिळू शकतो.

कर्क रास

घरात आनंदाचे वातावरण राहील. एखादे मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता असून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असून परीक्षेत चांगले यश मिळू शकते.

सिंह रास

नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. वरिष्ठांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. निर्णयक्षमता मजबूत होईल, ज्यामुळे कठीण वाटणारी कामेही सहज पार पडू शकतात. धार्मिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी केलेले प्रवास फायदेशीर ठरू शकतात.

धनु रास

नशिबाची साथ मिळाल्याने हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. बचतीत वाढ होईल तसेच गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
१८ ते २६ मार्चदरम्यान ४ राशींचा भाग्योदय होणार! ग्रहांचा 'द्विगुरु योग', हाती बक्कळ पैसा येणार, सुख शांती लाभणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल