कांद्याची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 3 लाख 28 हजार 713 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख 23 हजार 813 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 303 ते 1178 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2290 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Weather Alert : महाराष्ट्रात आता पाऊस बरसणार, 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट
advertisement
लिंबूची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 931 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 454 क्विंटल लिंबूस 2500 ते 3500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव सर्वात कमी मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल लिंबूस 13250 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
द्राक्ष आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1072 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 613 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3000 ते 12000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 208 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक बाजारात आवक केळीस प्रतीनुसार 800 ते 1800 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला.





