advertisement

APMC Market : द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video

Last Updated:

राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहुयात. 

+
News18

News18

सांगली : राज्यातील मार्केटमध्ये आज वेगवेगळ्या पिकांची मोठी आवक पहायला मिळाली. राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहुयात.
कांद्याची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 3 लाख 28 हजार 713 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख 23 हजार 813 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 303 ते 1178 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2290 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
लिंबूची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 931 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 454 क्विंटल लिंबूस 2500 ते 3500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव सर्वात कमी मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल लिंबूस 13250 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
द्राक्ष आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1072 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 613 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3000 ते 12000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 208 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक बाजारात आवक केळीस प्रतीनुसार 800 ते 1800 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market : द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement