advertisement

राज्य परिवहन मंडळाची ST महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना 'गुड न्यूज', काय आहे नवी योजना?

Last Updated:

राज्य परिवहन मंडळाचे निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना एक 'गुड न्यूज' दिली आहे. आज एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे.

तिकिटांबद्दल बोलायचे तर, ‘ई- शिवनेरी’ बसचे महिला प्रवाशांना आणि 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात 50 टक्के सवलत असेल. तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘शिवनेरी’ बसचा प्रवास पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.
तिकिटांबद्दल बोलायचे तर, ‘ई- शिवनेरी’ बसचे महिला प्रवाशांना आणि 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात 50 टक्के सवलत असेल. तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘शिवनेरी’ बसचा प्रवास पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.
मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातल्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज विधानभवनात सभागृहामध्ये एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्य परिवहन मंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. एसटी महामंडळाकडून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये तुम्ही कमी पैशांमध्ये कुठेही फिरू शकता. आता यानंतर एसटी महामंडळाने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते कुठेही फिरू शकणार आहेत.
पूर्वी एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मोफत प्रवासाबाबत काही मर्यादा होत्या, पण आता त्या मर्यादा नसणार आहेत. एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेमध्ये निवृत्त कर्मचार्‍यांना दिलासा दिला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पती किंवा पत्नीसोबत वर्षभर मोफत प्रवास करता येणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील सेवानिवृत्त कर्मचारी कुटुंबाला होणार असून, ते आता कुठेही फिरू शकणार आहेत. यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना आर्थिक फायदा होणार आहे. एसटी आगारांमधील व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.
advertisement
दरम्यान, एसटी महामंडळाने गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना कमी तिकिटात कुठेही प्रवास करा, अशी ऑफरच जाहीर केली होती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना जर कुठे फिरायचे असेल, तर ते फिरू शकणार होते. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थ्यांची ट्रीप जाते, त्यावेळी एसटी महामंडळाने जादा बसेस सोडल्या होत्या. कोणत्याही गरजेच्या वेळी एसटी महामंडळाकडून राज्यातल्या जनतेसाठी मदतीचा हात येतोच. नुकतीच एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी घोषित केलेल्या नव्या योजनेमुळे निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या परिवाराला फायदा होणार, हे नक्की.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
राज्य परिवहन मंडळाची ST महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना 'गुड न्यूज', काय आहे नवी योजना?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement