जगातील सर्वात मोठ्या मेटल एक्सचेंजमध्ये भूकंप, ट्रेडिंग थांबवली; भयानक अस्थिरता, बाजारात भीतीचे सावट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Metal Exchange: जागतिक कमोडिटी बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर London Metal Exchange ने Copper, Zinc आणि Aluminium यांसारख्या धातूंच्या कॉन्ट्रॅक्ट्समधील ट्रेडिंग तात्पुरती थांबवली आहे.
लंडन: जागतिक कमोडिटी बाजारात हालचाल वाढत असताना London Metal Exchange (LME) वर अनेक महत्त्वाच्या धातूंच्या करारांमधील (कॉन्ट्रॅक्ट्स) ट्रेडिंग तात्पुरती थांबवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार एक्सचेंजने तांबे, जस्त, ॲल्युमिनियमयांसह इतर काही धातूंच्या करारांमध्ये व्यवहार स्थगित केले आहेत.
बाजारात दिसून येत असलेल्या असामान्य हालचाली आणि मोठ्या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. लंडन मेटल एक्सचेंज हे जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक धातूंच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मपैकी एक मानले जाते. येथे कॉपर, अॅल्युमिनियम, जिंक, Nickel यांसारख्या बेस मेटल्सच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात.
तज्ज्ञांच्या मते बाजारात अत्यधिक अस्थिरता निर्माण झाल्यास एक्सचेंज काही वेळा ट्रेडिंग तात्पुरती थांबवते. यामागील उद्देश म्हणजे बाजारातील अस्थिरता नियंत्रित ठेवणे आणि गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करणे हा असतो.
advertisement
मात्र सध्या ट्रेडिंग पुन्हा कधी सुरू होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे बाजारातील सहभागी आणि गुंतवणूकदार आता एक्सचेंजकडून होणाऱ्या पुढील अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 10:27 PM IST
मराठी बातम्या/मनी/
जगातील सर्वात मोठ्या मेटल एक्सचेंजमध्ये भूकंप, ट्रेडिंग थांबवली; भयानक अस्थिरता, बाजारात भीतीचे सावट









