TRENDING:

आज अनंत चतुर्दशी! बाप्पा जाता जाता या 4 राशीचं नशीब उजाडून जाणार, निरोगी आयुष्यासह धनलाभ होणार

Last Updated:

Anant Chaturdashi 2025 : वैदिक पंचांगानुसार आज दिनांक 6 सप्टेंबर 2025, शनिवार आहे. आज अनंत चतुर्दशीचा दिवस असून गणरायाच्या विसर्जनाचा हा विशेष दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वैदिक पंचांगानुसार आज दिनांक 6 सप्टेंबर 2025, शनिवार आहे. आज अनंत चतुर्दशीचा दिवस असून गणरायाच्या विसर्जनाचा हा विशेष दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. ग्रह-नक्षत्रांची अनोखी स्थिती आणि बाप्पांच्या कृपेने हा दिवस सर्व राशींना वेगवेगळ्या प्रकारे लाभदायी ठरणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. आज होणारा दुर्लभ ग्रहयोग जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची चिन्हे दर्शवत आहे. चला तर जाणून घेऊया 12 राशींचे आजचे भविष्य.
Astrology News
Astrology News
advertisement

मेष (Aries)

मेष राशीच्या व्यक्तींना आज थोडा राग वाढलेला जाणवेल. आपल्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांकडे "सर्व काही चांगल्यासाठीच घडते" या दृष्टीकोनातून पाहिल्यास लाभ होईल. संयम ठेवल्यास दिवस सुरळीत जाईल.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांना आज आयुष्यात महत्त्वपूर्ण वैचारिक बदलाची जाणीव होईल. पूर्वीच्या अनुभवांमुळे नवीन विचारसरणीकडे वाटचाल सुरू होईल. करिअर आणि वैयक्तिक जीवनासाठी हे विचार परिवर्तन उपयुक्त ठरेल.

advertisement

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या व्यक्तींना आज स्पर्धकांवर मात करण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्षेत्रात यश मिळेल. मेहनतीचे फळ अपेक्षेपेक्षा जास्त मिळण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांना आज कीर्ती व प्रसिद्धी मिळण्याची संधी असेल. नोकरी आणि व्यवसायात धैर्याने निर्णय घेण्याची गरज भासेल. आत्मविश्वास ठेवा, यश तुमच्याच पायाशी आहे.

सिंह (Leo)

advertisement

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरमधील बदलांसाठी योग्य आहे. नवीन कामांच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. तरुण मंडळींना धाडसी विचार सुचतील.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या व्यक्तींच्या महत्त्वाकांक्षा आज अधिक बळकट होतील. नवीन दिशेने प्रगतीचे मार्ग खुलतील. करिअर वाढीसाठी हा दिवस योग्य ठरेल.

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांना आज त्यांच्या कामातील आत्मविश्वास आणि तडफ इतरांना जाणवेल. मात्र, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे.

advertisement

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांना आज कलाक्षेत्रात यश मिळेल. कलाकार, संगीतकार, लेखक यांना नवीन संधी मिळतील. प्रेरणादायी घटना घडतील.

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांना आज ध्येय साध्य करण्याची प्रेरणा मिळेल. कवी, लेखक आणि कलावंतांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल.

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनी आज रात्रीचे जागरण टाळावे. कामात होणारे बदलही उत्साह निर्माण करतील. आरोग्याची काळजी घ्या.

advertisement

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांना आज उपासना, भक्तीभाव आणि श्रद्धेमुळे मानसिक समाधान मिळेल. महिलांनी मात्र घाईगडबडीत निर्णय घेणे टाळावे.

मीन (Pisces)

मीन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस आनंदाने व्यतीत करण्यासाठी सर्वोत्तम आहे. वर्तमान क्षणाचा स्वीकार करा आणि त्यात सुख शोधा.

(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
आज अनंत चतुर्दशी! बाप्पा जाता जाता या 4 राशीचं नशीब उजाडून जाणार, निरोगी आयुष्यासह धनलाभ होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल