TRENDING:

सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी, मका आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?

Last Updated:

आज कृषी बाजारात सोयाबीन आणि मक्याची आवक काहीशी घटलेली असताना, कांद्याची आवक मात्र लक्षणीय वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, कांदा, मका आणि सोयाबीन या तिन्ही प्रमुख शेतमालांच्या दरांमध्येही चढ-उतार नोंदविण्यात आले आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : मंगळवार, 23 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी बाजारांमध्ये शेतमालाच्या आवकमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. सोयाबीन आणि मक्याची आवक काहीशी घटलेली असताना, कांद्याची आवक मात्र लक्षणीय वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, कांदा, मका आणि सोयाबीन या तिन्ही प्रमुख शेतमालांच्या दरांमध्येही चढ-उतार नोंदविण्यात आले आहेत.  आज सोयाबीन, कांदा आणि मक्याला किती मिळाला दर पाहुयात.
advertisement

मक्याचे उच्चांकी दर कायम

कृषी मार्केटच्या अधिकृत वेबसाईटवर सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी बाजारात मक्याची एकूण आवक 37 हजार 375 क्विंटल इतकी झाली. यामध्ये सर्वाधिक 8 हजार 950 क्विंटल हायब्रीड मक्याची आवक नाशिक कृषी बाजारात झाली. नाशिक बाजारात मक्यास किमान 1275 रुपये तर कमाल 1775 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. दरम्यान, मक्याला सर्वाधिक दर मुंबई कृषी बाजारात मिळाल्याचे दिसून आले. मुंबई बाजारात दाखल झालेल्या 430 क्विंटल मक्यास किमान 2500 रुपये ते कमाल 3800 रुपये प्रतिक्विंटल असा भाव नोंदविण्यात आला. सोमवारी नोंदविण्यात आलेला मक्याचा उच्चांकी दर मंगळवारीही स्थिर राहिला. इतर बाजारांत मात्र दरात किरकोळ चढ-उतार दिसून आले.

advertisement

Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, थंडीची 'त्सुनामी' येणार; हवामान खात्याचा अलर्ट

कांद्याची आवक वाढली; सर्वाधिक दर स्थिर

राज्यातील कृषी बाजारांमध्ये मंगळवारी कांद्याची मोठी आवक झाली. एकूण 1 लाख 74 हजार 484 क्विंटल कांद्याची आवक झाली असून, त्यापैकी सर्वाधिक 44 हजार 821 क्विंटल आवक सोलापूर कृषी बाजारात झाली. सोलापूर बाजारात लाल कांद्याला किमान 100 रुपये तर कमाल 3000 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. दरम्यान, कांद्याला सर्वाधिक दर कोल्हापूर कृषी बाजारात मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर बाजारात दाखल झालेल्या 3 हजार 133 क्विंटल लाल कांद्याला कमाल 3300 रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. सोमवारी मिळालेल्या या सर्वाधिक दरात मंगळवारी कोणताही बदल झालेला नाही.

advertisement

सोयाबीनच्या दरात तेजी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी, मका आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

राज्यातील कृषी बाजारांमध्ये 23 डिसेंबर रोजी सोयाबीनची एकूण आवक 52 हजार 537 क्विंटल इतकी झाली. यामध्ये सर्वाधिक 15 हजार 114 क्विंटल आवक लातूर कृषी बाजारात नोंदविण्यात आली. लातूर बाजारात सोयाबीनला किमान 3558 रुपये तर कमाल 4786 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. दरम्यान, सोयाबीनला सर्वाधिक दर वाशिम कृषी बाजारात मिळाल्याचे दिसून आले. वाशिम बाजारात दाखल झालेल्या 5584 क्विंटल सोयाबीनला किमान 4113 रुपये तर कमाल 5790 रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. सोमवारी नोंदविण्यात आलेल्या दरांच्या तुलनेत मंगळवारी सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी, मका आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल