मिळवलेल्या यशाचा आनंद घ्या, पण गर्व डोक्यात शिरू देऊ नका. आज सांघिक कामात सहभागी होण्यावर भर द्यावा. मालमत्तेचे व्यवहार अंतिम करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. नोकरीत सध्या तोचतोचपणा जाणवू शकतो. जोडीदाराशी संवाद साधून आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्यास नाते अधिक चांगले होईल.
भाग्यशाली अंक: 7
भाग्यशाली रंग: पिंक
अंक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)
advertisement
तुमची नियोजन करण्याची उत्तम कौशल्ये आज कामी येतील. मुलांच्या प्रगतीची चांगली बातमी कानावर पडेल. एखादे कायदेशीर प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे. समाजकार्यासाठी दिलेली मदत सार्थकी लागेल. आज तुम्ही थोडे भावूक आणि घाईत असाल. वैवाहिक नात्यात सुख आणि समाधान लाभेल.
भाग्यशाली अंक: 9
भाग्यशाली रंग: जांभळा
अंक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोक)
कौटुंबिक वातावरणात थोडी अशांतता जाणवू शकते. मुलांकडून शैक्षणिक क्षेत्रातील आनंदवार्ता मिळेल. आरोग्य उत्तम राहील आणि तुमचे व्यक्तिमत्व उठून दिसेल. अचानक धनलाभाचे योग असून प्रॉपर्टीमधून फायदा होऊ शकतो. जोडीदारासोबतच्या नात्यात नवा उत्साह आणि ओढ जाणवेल.
भाग्यशाली अंक: 18
भाग्यशाली रंग: मॅजेंटा
मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; दुहेरी खुशखबर मिळणार पण..
अंक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)
आज खूप प्रवास घडेल, कदाचित निवासाचे ठिकाण बदलण्याचे विचार मनात येतील. मनात काही विषयांवरून चिंता असेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका आणि विश्रांती घ्या. तुमचे विचार इतरांना प्रभावी वाटतील आणि तुमच्या प्रयत्नांचे चीज होईल. संध्याकाळचा वेळ जोडीदारासोबत बाहेर फिरण्यात घालवणे चांगले राहील.
भाग्यशाली अंक: 6
भाग्यशाली रंग: गोल्डन ब्राऊन
अंक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक)
आज नातेवाईकांसोबत वेळ व्यतीत होईल. साहित्यिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रस वाढेल. शारीरिक ताजेतवाणेपणा जाणवेल, नवीन फिटनेस रुटीन सुरू करण्यासाठी हा दिवस योग्य आहे. परदेशातून धनलाभ किंवा सन्मान मिळण्याची चिन्हे आहेत. प्रेमसंबंधांत थोडा तणाव असू शकतो, त्यामुळे जोडीदारासोबत वाद टाळणे हिताचे आहे.
भाग्यशाली अंक: 4
भाग्यशाली रंग: रॉयल ब्लू
अंक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)
वरिष्ठ मंडळी तुमचे विचार महत्त्वाचे मानतील आणि ते ऐकून घेतील. आज तुम्ही थोडे बिनधास्त मूडमध्ये असाल. डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे करिअरमध्ये प्रगती होईल आणि सहकारी तुमचे कौतुक करतील. काही गोष्टींचा स्पष्ट विचार करण्यासाठी जोडीदारापासून थोडा वेळ एकांतात घालवणे आवश्यक आहे.
भाग्यशाली अंक: 9
भाग्यशाली रंग: केशर
अंक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक)
निसर्गाच्या सानिध्यात किंवा मोकळ्या वातावरणात शांत बसण्यासाठी वेळ काढा. आज मन थोडे अस्वस्थ असू शकते. त्वचेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. उत्पन्नात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. नात्यात काही तणाव निर्माण झाल्यास जोडीदाराला वेळ देऊन विषय सोडवण्याचा प्रयत्न करा.
भाग्यशाली अंक: 6
भाग्यशाली रंग: क्रीम
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; भाग्याची दारे उघडणार पण..
अंक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 and 26 तारखेला जन्मलेले लोक)
तुमच्यासमोर येणारी आव्हाने तुम्ही जिद्दीने स्वीकाराल. घरातील स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उत्तम प्रकृतीमुळे मन दिवसभर प्रसन्न राहील. कामात सक्रिय राहा, एखादी मीटिंग तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. जोडीदाराशी असलेले नाते अधिक विश्वासाचे आणि घट्ट होईल.
भाग्यशाली अंक: 15
भाग्यशाली रंग: रोझी ब्राऊन
अंक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक)
आज तुमचा कल तत्त्वचिंतनाकडे असेल. आईला तुमच्या मदतीची किंवा वेळेची गरज भासू शकते. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. वरिष्ठांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रेमसंबंधांत नवीन आणि गंभीर वळण येण्याचे संकेत आहेत.
भाग्यशाली अंक: 2
भाग्यशाली रंग: पिंक
