TRENDING:

Ank Jyotish: जहागिरदारी मिरवण्यात एक नंबर! पैसा आला की चैनी, उधळपट्टी करणारे लोक या जन्मतारखांचे

Last Updated:

Numerology: तुम्हीही रात्रंदिवस मेहनत करताय, पण महिन्याचा शेवट येईपर्यंत खिशात काहीच उरत नाहीये का? आपल्याला वाटतं की हे सगळं खराब नियोजनामुळे होतंय, पण अंकशास्त्रानुसार तुमच्या जन्म तारखेचा यात मोठा वाटा असू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांच्या स्वभावातच खर्च करण्याची वृत्ती असते असे सांगितले जाते. हे लोक काटकसर करणं तर सोडाच, पण आपले छंद पूर्ण करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. पैसा वाचवणं ही या लोकांसाठी जणू एक मोठी कसरतच असते.
News18
News18
advertisement

तुम्हीही रात्रंदिवस मेहनत करताय, पण महिन्याचा शेवट येईपर्यंत खिशात काहीच उरत नाहीये का? आपल्याला वाटतं की हे सगळं खराब नियोजनामुळे होतंय, पण अंकशास्त्रानुसार तुमच्या जन्म तारखेचा यात मोठा वाटा असू शकतो. जाणून घेऊया कोणत्या तारखेचे लोक आपल्या आवडीनिवडीसाठी बँक बॅलन्ससुद्धा संपवून टाकू शकतात.

मूलांक 3 (जन्म तारीख 3, 12, 21, 30)

advertisement

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 3 असतो. या अंकाचा स्वामी देवगुरु बृहस्पती आहे. बृहस्पती हा विस्ताराचा कारक असल्यामुळे या लोकांना चैनीचं आयुष्य जगायला आवडतं. त्यांना दर्जाहीन गोष्टी कधीच आवडत नाहीत. उत्तम सोयीसुविधा, चांगलं खाणं-पिणं आणि इतरांना मदत करण्याच्या नादात हे लोक आपली जमापुंजी खर्च करून टाकतात. त्यांच्यासाठी पैसा जपण्यापेक्षा मान-सन्मान आणि मोठेपणा महत्त्वाचा असतो, म्हणूनच यांची बचत नेहमीच कमी असते.

advertisement

धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; मार्चमध्ये कोणाला सूर गवसणार?

मूलांक 5 (जन्म तारीख 5, 14, 23)

मूलांक 5 चा स्वामी बुध ग्रह आहे. या तारखेला जन्मलेले लोक स्वभावाने खूप चंचल आणि जिज्ञासू असतात. त्यांना साचेबद्ध आयुष्य जगणं अजिबात आवडत नाही. नवीन गॅजेट्स खरेदी करणं, अचानक ट्रिप प्लॅन करणं किंवा नवीन गोष्टी करून पाहणं ही त्यांची सवय असते. तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी हे लोक विचार न करता शॉपिंग करतात. त्यांच्यासाठी पैसा हा हाताचा मळ असतो. भविष्याचं नियोजन करण्यापेक्षा आजचा दिवस मजेत जगण्यावर त्यांचा जास्त विश्वास असतो.

advertisement

मूलांक 9 (जन्म तारीख 9, 18, 27)

ज्यांचा जन्म 9, 18 किंवा 27 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 9 असतो आणि त्याचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा साहस आणि उत्साहाचं प्रतीक आहे, पण कधीकधी हाच उत्साह आर्थिक बाबतीत महागात पडतो. हे लोक खूप हळवे असतात आणि दुसऱ्याचं दुःख पाहून स्वतःचा खिसा रिकामा करतात. त्यांची हीच उदारता त्यांच्या बचतीच्या मार्गात अडचण ठरते. तसंच, घाईघाईत गुंतवणूक करणं किंवा विचार न करता मोठा खर्च करणं यामुळे महिन्याच्या शेवटी त्यांना आर्थिक ओढाताण सहन करावी लागते.

advertisement

मृत्युच्या आधी 6 महिन्यांपासून दिसतात अशा गोष्टी; आपली ओळखण्यात होते चूक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मानलं गड्या! दूध शिल्लक राहिलं, पांडुरंगनं डोकं लावलं, आता 25 लाखांचा टर्नओव्हर
सर्व पहा

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही छोटे उपाय: मूलांक 3 च्या लोकांनी आपल्याकडे नेहमी एक पिवळा रुमाल ठेवावा आणि गुरुवारी केशरचा टिळा लावावा. मूलांक 5 च्या लोकांनी बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घालावा, यामुळे तुमचे निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. मूलांक 9 च्या लोकांनी हनुमानाची उपासना करावी आणि मंगळवारी लाल रंगाच्या वस्तू दान करण्याऐवजी स्वतः वापराव्यात.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Ank Jyotish: जहागिरदारी मिरवण्यात एक नंबर! पैसा आला की चैनी, उधळपट्टी करणारे लोक या जन्मतारखांचे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल