पूजा करताना नेहमी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत, याविषयी जाणून घेऊ. 25 जुलै रोजी श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात शिवभक्त भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करतात, तुम्हीही पूजा करणार असाल तर पूजेदरम्यान कोणत्या रंगाचे कपडे घालावेत. याविषयी सविस्तरपणे समजून घेऊया.
श्रावणात कोणता रंग शुभ मानला जातो -
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होत आहे. या महिन्यात हिरवे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. विवाहित महिला हिरव्या साड्या आणि हिरव्या बांगड्या परिधान करतात, असे मानले जाते की श्रावण महिन्यात हिरवे कपडे परिधान केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. यासोबतच, देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. श्रावण महिन्यात पूजा-उपवास करणाऱ्यांनी विशेषतः हलके गुलाबी, पांढरे, हिरवे असे कपडे परिधान करावेत. याशिवाय केशरी, लाल, पिवळे, गुलाबी हे काही रंग शुभ मानले जातात.
advertisement
गजलक्ष्मी राजयोग अखेर जुळला! आता चमकण्याचे दिवस या 4 राशींच्या नशिबात
श्रावणात या रंगाचे कपडे वापरू नयेत -
श्रावण महिन्यात काही रंगाचे कपडे वापणे टाळावे. व्रत उपवास करणाऱ्यांनी श्रावणात काळे कपडे परिधान करू नयेत, त्यामुळं जीवनात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. याशिवाय, महादेवाची पूजा करणाऱ्यांनी तपकिरी आणि खाकी रंगाचे कपडे देखील परिधान करणे टाळावे. ते अशुभतेचे प्रतीक मानले जाते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
आत्तापर्यंत चालून गेलं! वर्ष 2025 मधील शेवटचे 6 महिने या राशींसाठी खडतर, संकटे
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)