देवघर : शनिदेवाला सर्वात क्रूर ग्रहांपैकी एक मानले जाते. जेव्हा जेव्हा शनि ग्रह आपली राशी बदलतो, मावळतो आणि उगवतो तेव्हा सर्व राशींमध्ये गोंधळ होतो. तसेच जेव्हाही शनीची कोणत्याही राशीवर चांगली दृष्टी पडते तेव्हा त्या राशीचे नशीब त्याच्यासाठी चमकते. न झालेली कामे पूर्ण होतात. तसेच घरातून आर्थिक संकटंही दूर होते.
जेव्हा शनिची दृष्टी पडते तेव्हा पूर्ण झालेले कामही खराब होते. दुर्घटनेची शक्यता वाढते. होळीच्या आधी शनिदेव आपल्याच स्वराशीमध्ये कुंभ राशीत उदय होणार आहेत. यामुळे चार राशींवर याचा चांगला प्रभाव पडणार आहे. शनिदेव केव्हा उदय होणार आहे, याचा कोणत्या राशींवर प्रभाव पडणार आहे, याबाबत जाणून घ्या.
advertisement
देवघरच्या पागल बाबा आश्रम स्थित मुद्गल ज्योतिष केंद्राचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, शनि आता मावळला आहे आणि होळीच्या आधी म्हणजे 18 मार्चला शनी आपल्याच स्वराशि कुंभमध्ये उदय होणार आहे. जेव्हा शनिचा उदय होईल, तेव्हा शनिचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव सुरू होईल. त्या चार राशी वृषभ, कर्क, कन्या आणि कुंभ आहे. कुंभवर आता शनिचा नकारात्मक प्रभाव पडत आहे. मात्र, जेव्हा शनिचा उदय होईल, तेव्हा कुंभ राशीच्या लोकांचा फायदा होणार आहे.
bhandara app : कुठे सुरूये भंडारा, आता मोबाईलवर होईल माहिती, हे अॅप देईल सर्व माहिती..
या 4 राशींवर पडणार प्रभाव -
वृषभ : शनि देवाच्या उदयाने वृषभ राशीवर चांगला आणि सकारात्मक प्रभाव पडणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. अचानक धनाचा लाभ होईल. कार्य पूर्ण होण्यामध्ये समस्या येत असेल त्याचे समाधान होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीने शुभ फळाची प्राप्ती होणार आहे. यामुळे कामाच्या संदर्भात तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. हा प्रवास खूप फायदेशीर ठरणार आहे.
कर्क : शनीच्या उदयाचा कर्क राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. सध्या कर्क राशीवर वाहन अपघात होण्याची शक्यता आहे. शनीच्या उदयाने ही समस्या संपेल. आरोग्यविषयक समस्याही दूर होतील. शत्रूवर विजय मिळेल. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असल्याने मन प्रसन्न राहील.
कन्या : शनिच्या उदयाने कन्या राशीवर खूप चांगला आणि सकारात्मक प्रभाव पडणार आहे. प्रलंबित प्रकरणे निकाली निघतील. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर शनिदेवाच्या उदयाच्या वेळी योग्य होऊन जाईल. व्यवसायात जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शारीरिक समस्या दूर होणार आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.
कुंभ : शनीच्या उदयाचा कुंभ राशीच्या लोकांवर सर्वाधिक सकारात्मक परिणाम होणार आहे. सध्या शनीची वाईट नजर कुंभ राशीवर आहे. मात्र शनिदेव कुंभ राशीत उगवताच कुंभ राशीच्या लोकांचे नशीब उजळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे. आरोग्यही चांगले राहील.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती ही राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी चर्चा केल्यानंतर लिहिली आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
