TRENDING:

आज रात्री 01 वाजून 02 मिनिटांनी 3 राशींचं नशीब पालटणार, करिअर-बिझनेसमध्ये होणार जबरदस्त फायदा

Last Updated:

गेल्या 23 दिवसांपासून बुध ग्रह वक्री अवस्थेत होता, ज्यामुळे अनेक राशींच्या जातकांना संवाद, तंत्रज्ञान आणि नियोजनात अडचणी येत होत्या. आता बुध सरळ चालीने चालणार असल्याने, उद्या 22 मार्चपासून विशेषतः 3 राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Guru Margi : ज्योतिषशास्त्रामध्ये बुद्धी, तर्क आणि व्यापाराचा कारक मानला जाणारा बुध ग्रह आज, 21 मार्च 2026 रोजी रात्री उशिरा म्हणजेच 01 वाजून 02 मिनिटांनी कुंभ राशीमध्ये आपली चाल बदलून 'मार्गी' झाला आहे. गेल्या 23 दिवसांपासून बुध ग्रह वक्री अवस्थेत होता, ज्यामुळे अनेक राशींच्या जातकांना संवाद, तंत्रज्ञान आणि नियोजनात अडचणी येत होत्या. आता बुध सरळ चालीने चालणार असल्याने, उद्या 22 मार्चपासून विशेषतः 3 राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार आहेत.
News18
News18
advertisement

मेष - उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार

मेष राशीच्या जातकांसाठी बुधाचे मार्गी होणे अत्यंत फलदायी ठरेल. बुध तुमच्या राशीच्या 11 व्या भावात मार्गी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नोकरीत जे अडथळे येत होते, ते आता दूर होतील. पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा मोठे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. तुमचे नेटवर्क वाढेल, ज्याचा फायदा दीर्घकाळासाठी होईल. अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग आहेत.

advertisement

मिथुन - नशिबाची भक्कम साथ मिळेल

मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध आहे, त्यामुळे बुधाची सरळ चाल तुमच्यासाठी 'राजयोगा'सारखी सिद्ध होईल. बुध तुमच्या 9 व्या भावात मार्गी झाला आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगल्या संधी मिळतील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्ग मोकळे होतील. जर तुमचा व्यवसाय आयात-निर्यातीशी संबंधित असेल, तर प्रचंड नफा होईल. प्रलंबित कामे आता वेगाने पूर्ण होतील आणि तुमच्या योजनांना यश मिळेल.

advertisement

कुंभ - निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढणार

बुध ग्रह तुमच्याच राशीत मार्गी झाला आहे, जिथे आधीच शनिदेव विराजमान आहेत. यामुळे तुम्हाला दुहेरी लाभ मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमची संवादशैली प्रभावी ठरेल, ज्यामुळे तुम्ही कठीण मीटिंग्स किंवा सादरीकरणे सहज हाताळू शकाल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. डिजिटल मार्केटिंग, कोडिंग किंवा सल्लागार क्षेत्रात असलेल्या व्यावसायिकांना अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून आता चांगला परतावा मिळण्यास सुरुवात होईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीत काय आहे? नववी नापास पुणेकरानं सुरू केला बिझनेस, 16 हजार गुंतवणूक अन् लाखोंची उलाढाल, Video
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
आज रात्री 01 वाजून 02 मिनिटांनी 3 राशींचं नशीब पालटणार, करिअर-बिझनेसमध्ये होणार जबरदस्त फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल