advertisement

नोकरीत काय आहे? नववी नापास पुणेकरानं सुरू केला बिझनेस, 16 हजार गुंतवणूक अन् लाखोंची उलाढाल, Video

Last Updated:

Business Success: अमित यांनी छोट्या गाड्यावरून सुरू केलेला रबडीचा व्यवसाय आज 21 शाखांवर पोहोचला आहे.

+
नोकरीत

नोकरीत काय आहे? नववी ‘फेल’ पुणेकरानं सुरू केला बिझनेस, 16 हजार गुंतवणूक अन् लाखोंची उलाढाल, Video

पुणे : शिक्षणात फार पुढे जाता आलं नाही म्हणून आयुष्यात काही मोठं करता येत नाही, अशी समजूत अनेकदा केली जाते. मात्र जिद्द, मेहनत आणि व्यवसायाची योग्य कल्पना असेल तर यश नक्की मिळू शकतं, हे पिंपरी-चिंचवडमधील तरुण अमित दगाबाज यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. नववीपर्यंतच शिक्षण झालेल्या अमित यांनी छोट्या गाड्यावरून सुरू केलेला रबडीचा व्यवसाय आज 21 शाखांवर पोहोचला आहे. या व्यवसायातून महिन्याला लाखोंची उलाढाल होत असल्याची माहिती लोकल18 सोबत बोलताना त्यांनी दिली.
अमित दगाबाज यांनी 2019 साली केवळ 16 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून चिखली परिसरातील साने चौक येथे छोटा गाडा टाकून रबडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. शिक्षण नववीपर्यंतच झाल्यामुळे व्यवसाय यशस्वी होईल की नाही, याबाबत घरच्यांनाही सुरुवातीला शंका होती. त्यामुळे कमी गुंतवणुकीत व्यवसायाची सुरुवात करून अनुभव घेत पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीच्या काळात मेहनत, सातत्य आणि ग्राहकांच्या पसंतीचा अभ्यास यामुळे त्यांच्या रबडीला चांगला प्रतिसाद मिळू लागला.
advertisement
16 प्रकारच्या रबडी अन्...
व्यवसाय करताना त्यांनी वेळोवेळी बदल करत नवनवीन प्रयोग केले. ग्राहकांच्या आवडी लक्षात घेऊन रबडीचे विविध फ्लेवर्स सुरू करण्यात आले. आज त्यांच्या दुकानात सीताफळ, अंजीर फ्रायफ्रूट, मँगो, रसमलाई, गुलकंद, चॉकलेट अशा एकूण 16 प्रकारच्या रबडी उपलब्ध आहेत. तसेच 30 हून अधिक प्रकारचे आईस्क्रीम फ्लेवर्सही ग्राहकांना मिळतात. चव, गुणवत्ता आणि परवडणारी किंमत या तिन्ही गोष्टींवर लक्ष दिल्यामुळे ग्राहकांची संख्या वाढत गेली.
advertisement
पुणे, मुंबईत 21 शाखा
सध्या ‘कृष्णाई रबडी हाऊस’च्या पुणे आणि मुंबईसह विविध ठिकाणी 21 शाखा सुरू आहेत. छोट्या गाड्यावरून सुरू झालेला हा व्यवसाय आता स्वतःच्या दोन दुकानांपर्यंत पोहोचला आहे. रबडीची किंमत 45 रुपयांपासून सुरू होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनाही हा पदार्थ परवडतो. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता व्यवसायाचा विस्तार सातत्याने होत आहे.
advertisement
महिन्याची उलाढाल 16 लाख
या व्यवसायामुळे केवळ स्वतःलाच नव्हे तर इतरांनाही रोजगार मिळाला आहे. सध्या त्यांच्या व्यवसायात आठ जण काम करत असून भविष्यात आणखी शाखा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. दरम्यान, या व्यवसायातून महिन्याला साधारण 15 ते 16 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे अमित दगाबाज यांनी सांगितले.
घरच्यांचा पाठिंबा, मेहनत आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द यामुळेच आज हा व्यवसाय उभा राहिला, असे अमित सांगतात. शिक्षण कमी असलं तरी मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवता येतं, याचं प्रेरणादायी उदाहरण म्हणजे त्यांचा प्रवास ठरतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
नोकरीत काय आहे? नववी नापास पुणेकरानं सुरू केला बिझनेस, 16 हजार गुंतवणूक अन् लाखोंची उलाढाल, Video
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement