इन्फ्रारेड कुकटॉप की इंडक्शन 1 तासात कोण जास्त वीज खातं? तुमच्या किचनसाठी कोण फायदेशीर?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेक शहरांमध्ये सध्या इंडक्शन सोबतच इन्फ्रारेड कुकटॉपची मागणी प्रचंड वाढली आहे. दिसायला इंडक्शनसारखाच असणारा हा इन्फ्रारेड कुकटॉप नक्की आहे तरी काय? तो वापरल्यास वीज बिल किती येईल? आणि इंडक्शनच्या तुलनेत तो परवडणारा आहे का? चला, या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेऊया.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे 'स्वयंपाकघर'. पण गेल्या काही काळापासून एलपीजी (LPG) गॅसचा पुरवठा आणि सातत्याने वाढणारे त्याचे दर यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. अशा परिस्थितीत अनेक गृहिणी आणि नोकरदार वर्ग आता स्वयंपाकासाठी गॅसऐजी विजेवर चालणाऱ्या पर्यायांकडे वळताना दिसत आहेत.
advertisement
advertisement
1 तास चालवल्यास किती वीज खर्च होते?इन्फ्रारेड कुकटॉप हे प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असतात. सामान्यतः एक इन्फ्रारेड कुकटॉप 2000 वॉट (2000W) क्षमतेचा असतो. जर तुम्ही हा कुकटॉप सलग 1 तास पूर्ण क्षमतेवर चालवला, तर साधारणपणे 2 युनिट वीज खर्च होते. दुसरीकडे, इंडक्शन कुकटॉप थोडे अधिक ऊर्जा कार्यक्षम असतात. 2000 वॉटचे इंडक्शन 1 तास चालवल्यास साधारण 1.5 ते 1.8 युनिट वीज लागते.
advertisement
2. खिशाला कोणता पर्याय स्वस्त? (खर्चाचे गणित)जर तुमच्या भागात विजेचा दर प्रति युनिट 8 रुपये असेल, तर खर्चाचा अंदाज खालीलप्रमाणे लावता येईल:इंडक्शन कुकटॉप: 1 तास वापरल्यास सुमारे 12 ते 15 रुपये खर्च येईल.इन्फ्रारेड कुकटॉप: 1 तास वापरल्यास सुमारे 15 ते 16 रुपये खर्च येईल.विजेच्या वापराचा विचार केला तर इंडक्शन थोडं सरस ठरतं, कारण ते इलेक्ट्रोमॅग्नेट ऊर्जेचा वापर करून थेट भांड्याला गरम करतं याउलट, इन्फ्रारेडमध्ये आधी काचेची पृष्ठभाग गरम होतो आणि मग ती उष्णता भांड्यापर्यंत पोहोचते.
advertisement
3. इन्फ्रारेड कुकटॉपचा सर्वात मोठा फायदा काय?तुम्ही म्हणाल की जर इंडक्शन वीज वाचवतं, तर लोक इन्फ्रारेडकडे का वळतायत? त्याचं उत्तर दडलंय तुमच्या स्वयंपाकघरातील भांड्यांमध्ये. इंडक्शनवर फक्त विशिष्ट 'इंडक्शन बेस' असलेली स्टीलची किंवा लोखंडी भांडीच चालतात. इन्फ्रारेड कुकटॉपवर तुम्ही स्टील, ॲल्युमिनियम, तांबे आणि अगदी मातीची भांडी सुद्धा वापरू शकता. म्हणजेच तुम्हाला नवीन भांडी खरेदी करण्याची अजिबात गरज नाही. जुनी सर्व भांडी यावर सहज चालतात.
advertisement
4. तुम्ही कोणता कुकटॉप निवडावा?हा निर्णय पूर्णपणे तुमच्या गरजेवर अवलंबून आहे.बजेट आणि वीज बिल: जर तुम्हाला फक्त वीज बिल वाचवायचे असेल आणि तुमच्याकडे इंडक्शनची भांडी असतील, तर इंडक्शन कुकटॉप हाच उत्तम पर्याय आहे.सवलत आणि स्वातंत्र्य: जर तुम्हाला तुमच्या घरातील सर्व प्रकारची भांडी वापरायची असतील आणि भांड्यांवर पुन्हा खर्च करायचा नसेल, तर इन्फ्रारेड कुकटॉप तुमच्यासाठी बेस्ट आहे.
advertisement







