फक्त मंत्रजपाने महादेव प्रसन्न होतात का?
हो, भगवान शंकर हे भावप्रिय आहेत. शिवपुराणानुसार, जर एखाद्या भक्ताकडे पूजेचे साहित्य नसेल, तरीही त्याने शुद्ध अंतःकरणाने आणि पूर्ण श्रद्धेने 'ॐ नमः शिवाय'चा जप केला, तर त्याला पूर्ण फळ मिळते. महादेवाला बाह्य उपचारांपेक्षा आंतरिक शांतता आणि भक्ती अधिक प्रिय आहे. मंत्राच्या लहरींनी जेव्हा तुमचे शरीर आणि मन शुद्ध होते, तेव्हा शिवाचे तत्त्व तुमच्यामध्ये जागृत होऊ लागते.
advertisement
मंत्राचा जप किती वेळा करावा?
मंत्राच्या संख्येला अध्यात्मात मोठे महत्त्व आहे. तुमच्या उद्देशानुसार तुम्ही जप ठरवू शकता.
मानसिक शांतीसाठी: दररोज किमान 108 वेळा जप करावा.
संकट निवारणासाठी: रोज 11 माळा किंवा सलग 40 दिवस जप करण्याचा संकल्प करावा.
सिद्धीसाठी: शास्त्रांनुसार, कोणत्याही मंत्राचा सवा लाख वेळा जप केल्यास तो मंत्र 'सिद्ध' होतो आणि त्याचे चमत्कारिक परिणाम दिसून येतात.
नित्य साधना: जर तुम्ही व्यस्त असाल, तर किमान 21 किंवा 51 वेळा श्रद्धेने घेतलेले नावही पुरेसे ठरते.
जप करण्याची योग्य विधी
मंत्राचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी खालील विधीचे पालन करणे हिताचे ठरते. पहाटेचा ब्रह्ममुहूर्त हा मंत्रजपासाठी सर्वोत्तम मानला जातो. सायंकाळी प्रदोष काळातही जप करणे फलदायी असते.जपासाठी लोकरीचे आसन किंवा कुशाचे आसन वापरावे. जमिनीवर थेट बसून जप करू नये. भगवान शंकराचा जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ वापरणे अनिवार्य मानले जाते. यामुळे मंत्राची ऊर्जा शरीरात प्रवाहित होते. जप करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.
जपाचे फळ आणि परिणाम
'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा नियमित जप केल्याने शरीरातील चक्रांचे शुद्धीकरण होते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, ताणतणाव कमी होतो आणि अकाली मृत्यूची भीती दूर होते. ज्यांच्या कुंडलीत शनीचा दोष किंवा साडेसाती आहे, त्यांच्यासाठी हा मंत्र सुरक्षा कवचासारखा काम करतो.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
