आज ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी पटणार नाही. तुम्ही साहित्यिक उपक्रमांकडे आकर्षित व्हाल. दिवसाचा बराचसा वेळ वाचन किंवा लेखनात जाईल. थंडीताप येऊ शकतो. उबदार कपडे वापरा. व्यवसायिकदृष्ट्या दिवस आनंदात जाईल. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. अशा परिस्थितीत शांत राहा. ही वेळही निघून जाईल, यावर विश्वास ठेवा.
Lucky Colour : Red
Lucky Number : 6
advertisement
शुभांक 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुमचं इतरांकडून कौतुक होईल. तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरदारांची पदोन्नती होऊ शकते. प्रेमाच्या बाबतीत जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल. जोडीदारासोबत आयुष्यातील अविस्मरणीय क्षण तुम्ही अनुभवाल. त्यासाठी वेळ अनुकूल आहे.
Lucky Colour : Peach
Lucky Number : 11
शुभांक 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज भावंडांसोबतचं ताणलेलं नातं सुधारेल. स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. तुम्हाला थोडं नैराश्य येऊ शकतं. त्याचा फटका व्यवसायाला बसेल. आजची संध्ययाकाळ जोडीदारासोबत आनंदात जाईल. यामुळे दिवसभराची धावपळ आणि तणावातून थोडा आराम मिळेल.
Lucky Colour : Light Red
Lucky Number : 1
शुभांक 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
ऑफिसमध्ये काम करताना वरिष्ठांशी संघर्ष टाळा. तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देण्यासाठी दिवस योग्य आहे. आज घराच्या बाहेर जाताना दरवाजे काळजीपूर्वक लॉक करा. अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ तुमच्यावर येईल. आर्थिकदृष्ट्या योग्य गुंतवणुकीचा निर्णय घ्याल. आत्मविश्वासानं परिस्थितीला सामोरं जा. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता वाटेल.
Lucky Colour : Maroon
Lucky Number : 7
शुभांक 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल, सावध राहा. मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी व्हाल. त्वचेची समस्या उद्भवण्याची शक्यता असून आवश्यकता भासल्यास त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नात चढ-उतार दिसत असले तरी भाग्य तुम्हाला साथ देईल. आज कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रेमाच्या बाबतीत आकर्षण आणि प्रेम यातील फरक समजून घ्या, फायद्याचं ठरेल.
Lucky Colour : White
Lucky Number : 17
साडेसातीमध्येही सुखात राहण्याचे उपाय! शनिदेवाचा पारा या गोष्टींमुळे आपोआप ओसरतो
शुभांक 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.
आजचा दिवस साहस आणि उत्साहानं भरलेला आहे. मनामध्ये असंतोषाची भावना राहील. तुमच्या जमिनीचं किंवा मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं, काळजी घ्या. ऑफिसमध्ये नोकरदारांना पदोन्नती मिळाल्यानं आनंद द्विगुणीत होईल. ऑफिसमध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता, अशावेळी तुमच्या मनातील भावना त्या व्यक्तीसमोर शेअर करा. त्यासाठी वेळ अनुकूल आहे.
Lucky Colour : Rosy Brown
Lucky Number : 18
शुभांक 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, यश येईल. भविष्याचं नियोजन करण्यासाठी आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देण्यासाठी दिवस उत्तम आहे. आरोग्याची काळजी घ्या. कारण सध्या तुम्ही अथकपणे काम करण्यास प्राधान्य देत आहात. पैसा आणि करिअर याला तुम्ही प्राधान्य द्याल. प्रेमाबाबत जोडीदाराच्या आयुष्यात बदल घडवण्याची संधी मिळेल.
Lucky Colour : Indigo
Lucky Number : 22
शुभांक 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मित्र किंवा सहकाऱ्यांकडून आज तुम्हाला कोणतीही मदत मिळणार नाही. आत्मसंतुष्ट होण्याची ही वेळ नाही. कार खरेदी करण्यासाठी चांगली वेळ आहे. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संबंध ताणले जाऊ शकतात, काळजी घ्या. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाईल. तुमच्या जीवनातील हे अविस्मरणीय क्षण असतील.
Lucky Colour : Lemon
Lucky Number : 7
आणखी काय संकट वाढून ठेवलंय! पिशाच योगात या राशींची होणार दुर्दशा; कठीण काळ
शुभांक 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुमच्या उत्पनातील काही रक्कम दान करा, फायद्याचं ठरेल. जीवनातील सुखसोयींचा उपभोग घेण्यासाठी योग्य वेळ आहे. मालमत्तेच्या देखभालीसाठी खर्च करावा लागेल. दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यश मिळेल. अविवाहित व्यक्तींना लग्न ठरविण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. याबाबतचा निर्णय घेणं फायदेशीर ठरेल.
Lucky Colour : Red
Lucky Number: 18