Shani Sade Sati: साडेसातीमध्येही सुखात राहण्याचे उपाय! शनिदेवाचा पारा या गोष्टींमुळे आपोआप ओसरतो, कामं तडीस
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Sade Sati Upay: ज्या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा शनिदोषाचा प्रभाव आहे, त्यांनी गाडी जपून चालवावी. खोटे बोलणे, लबाडी, फसवणूक, चोरी, दारू, जुगार, व्याभिचार इत्यादींपासून दूर राहावे.
मुंबई : सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे. मकर राशीवर साडेसातीचा तिसरा टप्पा, कुंभ राशीवर दुसरा टप्पा आणि मीन राशीवर साडे सातीचा पहिला टप्पा असेल. शनीची साडेसाती साडेसात वर्षे राहते हे सर्वांना माहीत असेलच.
ज्या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा शनिदोषाचा प्रभाव आहे, त्यांनी गाडी जपून चालवावी. खोटे बोलणे, लबाडी, फसवणूक, चोरी, दारू, जुगार, व्याभिचार इत्यादींपासून दूर राहावे. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देतात.
शनीची साडेसाती, शनिदोषाचा त्रास होऊ नये म्हणून 4 उपाय
जर तुमच्यावर साडेसाती किंवा धैय्याचा प्रभाव असेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी उपवास करून शनि महाराजांची पूजा करावी. शनिदेवाच्या कृपेने साडेसाती आणि धैय्याचे दुष्परिणाम कमी होतील. तुमच्या आयुष्यातील समस्या कमी होतील.
advertisement
शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनि स्तोत्राचे पठण करावे. साडेसाती आणि धैय्या राशीत असलेल्या लोकांनी दररोज या स्तोत्राचे पठण करू शकता. दररोज करणे शक्य नसेल तर शनिवारी करावे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी राजा दशरथ यांनी सर्वप्रथम शनिस्तोत्राचे पठण केले होते.
advertisement
साडेसाती आणि धैय्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शनिवारी शनि मंदिरात जाऊन छायादान करा. त्यासाठी स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल भरा. मंदिरात जाऊन त्यात आपली सावली पहा. त्यानंतर ते तेल गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा.
शनिदेवाचे आवडते झाड शमी आहे. शनिवारी शमीच्या झाडाची सेवा करा. त्याच्या मुळास पाणी द्या आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनीच्या बीज मंत्राचा ओम शं शनैश्चराय नम: जप दररोज किमान 3 वेळा करावा. दररोज करणे शक्य नसेल तर शनिवारी करावे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 03, 2025 10:59 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shani Sade Sati: साडेसातीमध्येही सुखात राहण्याचे उपाय! शनिदेवाचा पारा या गोष्टींमुळे आपोआप ओसरतो, कामं तडीस