Shani Astrology: नवीन वर्षात या राशींवर शनिचा 'दंडुका'; साडेसातीचा फेरा भयंकर त्रास देणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Sade Sati Dhaiya 2025: नवीन वर्ष 2025 सुरू होण्यास काही दिवस उरले आहेत. न्यायदेवता शनिचे राशीपरिवर्तन नवीन वर्षात होणार आहे. 29 मार्च 2025 रोजी रात्री 11:01 वाजता शनिदेव कुंभ राशीतून निघून गुरूच्या मीन राशीत प्रवेश करतील. शनीच्या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती आणि शनिदोषाचा प्रभाव राहील.
advertisement
मेष: शनीने मीन राशीत प्रवेश केल्याने मेष राशीच्या लोकांवर साडेसातीचा पहिला चरण सुरू होईल. मेष राशीवरील साडेसातीचा प्रभाव 29 मार्च 2025 ते 31 मे 2032 पर्यंत राहील. अशा परिस्थितीत मेष राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल. विशेषत: आर्थिक बाबींवर सतर्क राहिलं पाहिजे. पहिल्या टप्प्यात शनिदेव तुमच्या संपत्ती क्षेत्रावर आपला प्रभाव टाकतील.
advertisement
कुंभ: नवीन वर्षात कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील. कुंभ राशीवर 17 जानेवारी 2023 पासून साडेसाती लागली असून ती 3 जून 2027 पर्यंत राहील. शनीच्या साडेसातीचा दुसरा चरण या राशीवर सुरू आहे. कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या घटनांवर संयम ठेवावा लागेल. शनी साडेसातीचा दुसरा टप्पा कौटुंबिक जीवनावर संकटे आणतो. साडेसातीचा प्रभाव 23 फेब्रुवारी 2028 संपूर्ण कमी होईल.
advertisement
मीन: मीन राशीच्या लोकांवरही नवीन वर्षात शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील. तुमच्यावरील साडेसातीचा पहिला टप्पा 29 मार्च 2025 रोजी पूर्ण होईल. त्यानंतर दुसरा टप्पा सुरू होईल. अशा परिस्थितीत, नवीन वर्षात तुम्हाला मार्चपर्यंत आर्थिक क्षेत्र आणि नंतर कौटुंबिक जीवनाची विशेष काळजी घ्यावी लागेल. शनीच्या साडेसातीचा प्रभाव तुमच्यावर 7 एप्रिल 2030 पर्यंत राहील.
advertisement
मकर: नवीन वर्षातही मार्चपर्यंत साडेसाती तुमच्या राशीला आहे. मकर राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव 29 मार्च 2025 पर्यंत राहील. साडेसातीचा तिसरा म्हणजेच शेवटचा टप्पा तुमच्या राशीवर चालू आहे. तिसऱ्या टप्प्यात साडेसातीचा परिणाम आरोग्यावर अधिक होतो. अशा परिस्थितीत नवीन वर्षात मार्चपर्यंत तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
advertisement
advertisement