Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणी'साठी महत्त्वाची बातमी, राज्य सरकारने दिला नवीन इशारा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
ई- केवायसी करण्याच्या प्रक्रियेला आता फक्त चार दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जर तुमचीही ई- केवायसी राहिली असेल. तर आत्ताच ही प्रक्रिया पूर्ण करा.
सरकारची सर्वाधिक चर्चेत राहिलेली 'लाडकी बहिण' योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू केलेल्या ह्या योजनेमार्फत लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यातच आता ई- केवायसीची मुदतही 31 डिसेंबरला संपणार आहे. अद्याप अजूनही तब्बल 45 लाख महिलांनी ई- केवायसी केलेली नाही. ई- केवायसी न केल्यामुळे राज्यातल्या लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. आता अशातच ई- केवायसी करण्याच्या प्रक्रियेला आता फक्त चार दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जर तुमचीही ई- केवायसी राहिली असेल. तर आत्ताच ही प्रक्रिया पूर्ण करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाखो महिलांसाठी ई- केवायसी करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक राहिले. ई- केवायसी करण्याची शेवटची संधी 31 डिसेंबरपर्यंत असून अद्याप सुमारे 45 लाख महिलांनी ई- केवायसी केलेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी आणखी एक दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. यामुळे आता राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. तसेच पती- वडील दोन्हीही नसलेल्या लाभार्थींची माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार असून त्यासाठी संकेतस्थळ तयार करण्यात आल्याचेही माहिती मिळत आहे.
advertisement
आधार कार्डाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची ओळख पटविण्याचे काम केले जात आहे. गरजू आणि होतकरू लाभार्थी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा, असा यामागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेतअंतर्गत गैरप्रकार टाळण्यासाठी 13 विविध पातळ्यांवर पडताळणी केली जात आहे. ज्यामुळे या योजनेतील काम अधिकच पारदर्शक होण्यास मदत होते, असे शासनाचे मत आहे. लाभार्थी महिलांनी योजनेसाठी अर्ज करताना काही चुका केल्या असतील तर या चुका दुरुस्त करण्याची त्यांना अखेरची संधी मिळणार आहे. ज्या महिला विधवा आहेत किंवा ज्यांना वडील नाहीत त्यांच्यासाठी या योजनेसाठीच्या पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
advertisement
लाडक्या बहिणींनो...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे ४ दिवस उरले आहेत.
सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र… pic.twitter.com/LMxMlLqlsV
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 27, 2025
advertisement
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील महिलांनाच प्रति महिना 1500 रुपये मिळत आहेत. लाडक्या बहीण योजनेची ही रक्कम सरकारकडून थेट बँक खात्यातच जमा होत आहे. आतापर्यंत अनेक हप्ते महिलांना मिळाले असून या पुढच्या हप्त्यांसाठी महिलांना E-Kyc करणे आता बंधनकारक असेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 7:33 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणी'साठी महत्त्वाची बातमी, राज्य सरकारने दिला नवीन इशारा











