भाजपसोबतची बोलणी फिस्कटली, एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला, धंगेकर अजितदादांच्या भेटीला, काय ठरलं?

Last Updated:

Pune Mahapalika Election: पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीसोबत युतीची चाचपणी सुरू केली आहे.

पुणे महापालिका निवडणूक
पुणे महापालिका निवडणूक
पुणे : भारतीय जनता पक्षाकडून सन्मानजक जागा मिळत नसल्याने अखेरच्या क्षणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून पुणे महानगरपालिकेसाठी युतीची बोलणी केली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्याची तयारी शिवसेनेने दाखवली असून महायुती म्हणून निवडणूक लढणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार यांच्याशी बोलणी करून शिवसेनेने एकप्रकारे भाजपवर दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सोमवारी सायंकाळी फोनवरून एकमेकांशी पुणे महानगरपालिकेसाठी युतीची चर्चा केली. पुणे भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने एकनाथ शिंदे यांनी
राष्ट्रवादीसोबत युतीची चाचपणी केली. साथीदाराच्या शोधात असलेल्या अजित पवार यांनीही लगोलग होकार दिल्याने स्थानिक नेते, माजी आमदार रविंद्र धंगेकर हे देखील अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यातील जिजाई बंगल्यावर पोहोचले.
advertisement

भाजपशी फिस्कटल्यानंतर शिवसेना अजितदादांच्या संपर्कात

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची पुण्यात युती होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत युती करत शिवसेना पुणे महानगरपालिका निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे.रवींद्र धंगेकर यांच्यासोबत सेनेचे इतर नेते देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते देखील अजित पवार यांच्या सोबत जिजाई बंगल्यात आहेत.
advertisement

एकनाथ शिंदे यांच्याकडून अजितदादांना प्रस्ताव

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २५ ते ३० जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. शिवसेनेला हवे असलेले प्रभाग पाहून, त्याविषयी चर्चा करून अजित पवार अंतिम निर्णय घेणार आहेत. शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अशी युती होण्याची दाट शक्यता आहे.
advertisement

शिवसेनेचे भाजपवर दबावतंत्र

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला पुण्यात २५ ते ३० जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र भाजपने २५ जागा सोडण्यास नकार दिल्याने शिवसेना पदाधिकारी हिरमुसले. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्यात जोरदार वादही झाला. केवळ १५ जागा सोडण्यास भाजपने तयारी दर्शवली. त्यानंतर युती-आघाडीचा पर्याय म्हणून धंगेकर यांनी अजित पवार यांची भेट घेऊन भाजपवर एकप्रकारे दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपसोबतची बोलणी फिस्कटली, एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला, धंगेकर अजितदादांच्या भेटीला, काय ठरलं?
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement