आज तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ शकता, त्यासाठी योग्य वेळ आहे. मुलांशी संबंधित वाईट बातमी समजल्यामुळे तुमचा दिवस खराब होऊ शकतो, काळजी घ्या. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या मेडिकल बिलावर मोठा खर्च होईल. आर्थिकदृष्ट्या कष्टाशिवाय पैसा मिळणार नाही. जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता असल्यानं विचारपूर्वक संवाद साधा.
Lucky Colour: Orange.
Lucky Number: 11
advertisement
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुम्हाला जीवनात चांगल्या गोष्टी मिळवायच्या आहेत. अशा परिस्थितीत धीर धरा, यश मिळेल. तुमचा मूड चांगला राहील. विरोधक सक्रिय राहतील. पण युक्ती आणि मुत्सद्दीपणानं त्यांच्यावर मात करू शकता. ऑफिसमध्ये वरिष्ठांचं वागणं तुमच्यासाठी अनुकूल असले तरी त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जोडीदाराशी नातं उत्तम राहील. एका परिपूर्ण प्रेमाच्या नात्याचा आनंद घ्याल.
Lucky Colour: Purple
Lucky Number: 18
या जन्मतारखांची जोडी जमली तर प्रगतीची सापडते वाट! लाख मोलाची ठरते साथ
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्यानं मानसन्मान मिळेल. कविता आणि साहित्य संमेलनात रूची राहील. नवीन घर खरेदी करण्यासाठी उत्तम वेळ आहे. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. जोडीदारासोबत विकेंडला रोमँटिक सहलीला जाण्याचा प्लॅन करू शकता.
Lucky Colour : Parrot Green
Lucky Number : 8
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
ऑफिसध्ये एखादं काम तुम्हाला त्रासदायक ठरत असले तरी तुमच्यासाठी ते काम करण्यास नकार देणं अवघड राहील, काळजी घ्या. तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतील. तुम्हाला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सध्याची वेळ उत्तम आहे. शारीरिक आणि मानसिक शक्ती तुम्हाला व्यावसायिक आव्हानांसाठी सज्ज करेल. जोडीदाराशी नातं तणावपूर्ण राहील. धीर धरा.
Lucky Colour : Electric Blue
Lucky Number : 3
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो, काळजी घ्या. कला, साहित्य आणि संगीतात रूची राहील. आज तुम्हाला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करू शकते, सावध राहा. अतिरिक्त खबरदारी घ्या. आर्थिकदृष्ट्या आज नफा मिळणार असला तरी त्या तुलनेत खर्च देखील होईल. प्रेमाच्या बाबतीत दृष्टिकोन सकारात्मक आणि निरोगी राहील.
Lucky Colour : Magenta
Lucky Number : 18
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुम्ही शाकाहारी आहार घेण्यास प्राधान्य द्याल. मुलांच्या शाळेतून चांगली बातमी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत गेल्या काही दिवसांपासून सतावत असणारी समस्या दूर झाल्यानं तुम्हाला बरे वाटेल. पण जास्त धावपळ करू नका. नवीन व्यवसायाच्या संधी मिळतील. ऑफिसमध्ये कामानिमित्त नवीन व्यक्तींची भेट होईल. प्रेमाच्या बाबतीत लवकरच तुम्हाला अपेक्षित जोडीदार मिळू शकतो.
Lucky Colour : Bottle Green
Lucky Number : 5
उरले 48 तास! ग्रह फिरणार या राशींवर संकट कोसळणार; नकारात्मक परिणाम त्रस्त करणार
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतील. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळेल. व्यवसायात आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांकडून नफा मिळेल. जोडीदाराशी नातं बिघडू शकते, काळजी घ्या. जोडीदाराला थोडा वेळ द्या, फायद्याचं ठरेल.
Lucky Colour: Lemon
Lucky Number: 7
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
वरिष्ठांकडे प्रलंबित असणारा तुमचा एखादा प्रस्ताव मार्गी लागेल. आज घरासाठी एखादी वस्तू खरेदी केल्यानं उत्साह वाढेल. शारीरिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. व्यायामाला सुरुवात करण्यासाठी उत्तम वेळ आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय स्तरावरून फायदेशीर संधी येऊ शकता, त्या स्वीकारा. जोडीदाराशी नातं उत्तम राहील.
Lucky Colour : Lavender
Lucky Number : 8
दसरा नेमका कधी? रावण दहनासाठी शुभ वेळ? पहा तिथी, शस्त्र पूजा मुहूर्त-महत्त्व
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज सरकारी काम मार्गी लागेल. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा, फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. विरोधकांवर मात करण्यासाठी धैर्य दाखवा. कष्टाचं फळ मिळेल. धनलाभ होईल. प्रेमाच्या बाबतीत नात्याला जोडीदाराशी असणाऱ्या नात्याला चांगला दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवा.
Lucky Colour : Magenta
Lucky Number : 5
