सहकारी किंवा शेजाऱ्यांशी झालेला वाद हाताबाहेर जाऊ शकतो. तुम्हाला एखाद्या स्थितीत अडकल्यासारखे वाटेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त असाल. शारीरिकदृष्ट्या चांगले वाटेल. नवीन फिटनेस प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. सहकाऱ्यांनी तुमची केलेली प्रशंसा तुम्हाला कौतुकास्पद वाटेल. नातेसंबंधांत वचनबद्धता असेल.
Lucky Number : 4
Lucky Colour : Electric Blue
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
नोकरशाहीचा सामना करणे अवघड जाईल. त्यामुळे संयम ठेवा. कविता आणि साहित्य संमेलनाविषयी रूची वाढेल. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा चांगली असेल. त्यामुळे तुम्हाला मजबूत वाटेल. प्रमोशन किंवा व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. अनौपचारिक संबंधांत गंभीर गोष्टी घडू शकतात.
Lucky Number : 5
Lucky Colour : Bottle Green
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मित्रांसोबत गैरसमज झाला असेल तर तो तात्काळ दूर करा. गेल्या काही दिवसांपासून येत असलेले कटू अनुभव आता दूर होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. सट्टेबाजीत फायदा होऊ शकतो. भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा भेटू शकते.
Lucky Number : 3
Lucky Colour : Magenta
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर वादाचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. स्वभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मालमत्तेची खरेदी फायनल करण्यासाठी दिवस चांगला आहे. मेहनत आणि हुशारीच्या जोरात पूर्वी बंद झालेले मार्ग पुन्हा मोकळे कराल. जोडीदाराशी नातं चांगले असेल.
Lucky Number : 22
Lucky Colour : Violet
शनिदेवाचं राहुला बळ! या राशींना मिळणार नेत्रदीपक यश; मोठ्या संकटातून सुटका
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
नातेसंबंधात निराशा जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. सेवाभावी कार्यात सहभागी व्हाल. त्वचेची समस्या जाणवत असेल तर लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बौद्धिक क्षमता चांगली असल्याने भविष्यातील गोष्टींबाबत विचार करू शकता. रोमान्समुळे प्रेम जीवन पुन्हा बहरेल.
Lucky Number : 2
Lucky Colour : Orange
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
खरी माहिती आणि क्षुल्लक अफवा यातील फरक ओळखा. संवाद आणि चिकाटीच्या जोरावर अनेक अडथळे पार करू शकाल. प्रमोशन, प्रगती किंवा ऑफिसमध्ये एक दिवसाची सुट्टी मागण्यासाठी दिवस चांगला आहे. प्रेम जीवन ठीक असेल. प्रेमात काही चांगल्या गोष्टी घडतील.
Lucky Number : 5
Lucky Colour : Sea Green
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुम्ही मजबूत स्थितीत असाल आणि क्षमतेचा बऱ्यापैकी वापर कराल. स्वभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या. चैनीच्या वस्तुंवर बेपर्वाईने खर्च टाळा. प्रिय व्यक्तीशी वाद होईल. पण हा वाद लवकरच मिटेल.
Lucky Number : 7
Lucky Colour : Lemon
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
भावंडांचा मूड चांगला नसेल. त्यामुळे त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करू नका. अनावश्यक वाद टाळा. डोकेदुखी जाणवू शकते. त्यामुळे आराम करा. चांगल्या मानसिकतेच्या जोरावर प्रकल्पाची चांगली योजना आखू शकतो. एखाद्या व्यक्तीपासून विभक्त होऊ शकता.
Lucky Number : 9
Lucky Colour : Maroon
आकाशाला गवसणी घालतील! या जन्मतारखांची जोडी जमली तर कुंडली कशाला बघता?
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
लोकांना तुमचे महत्त्व पटेल. मुलांसोबत आनंदाचे क्षण साजरे कराल. जखम होऊ नये यासाठी काळजी घ्या. कारण कोणतीही जखम बरी होण्यास वेळ लागेल. व्यवसायात एखादा चांगला प्रस्ताव मिळू शकतो. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. भविष्याचे नियोजन करण्यासाठी दिवस चांगला आहे.
Lucky Number :5
Lucky Colour : Lavender