TRENDING:

Daily Numerology: गुरुवारचा लकी अंक पाहून घ्या! या मूलांकांची गाडी सुसाट धावणार; पैसा येणार

Last Updated:

Today Numerology in Marathi 09 January 2025: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 09 जानेवारी 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभांक 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

आज वादात पडू नका. शारीरिकदृष्ट्या दिवस खूप उत्तम आहे. नवीन फिटनेस प्रोग्रॅम सुरू करू शकता. आंतरराष्ट्रीय व्यापारातून तुम्हाला वेगळी ओळख मिळेल. तुमची प्रशंसा होईल. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराशी असणारं नातं उत्तम राहील. फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.

Lucky Colour : Peach

Lucky Number 3

शुभांक 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

आज ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमचं मत विचारात घेतील. बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन करू शकता. डोळ्यांची काळजी घ्या. आवश्यतेनुसार नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च करू नका. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराशी तुमचे असलेले नातेसंबंध बिघडवण्याचा प्रयत्न केले जाऊ शकतात. अशा वेळी सावध राहा. शांत राहून निर्णय घ्या.

Lucky Colour : Brown

advertisement

Lucky Number : 7

शुभांक 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुमच्याकडे तुमचे नातेवाईक येऊ शकतात. दैनंदिन कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल. विरोधक सक्रिय राहतील. पण विरोधकांवर मात करण्यासाठी तुम्ही युक्ती आणि मुत्सद्दीपणा वापराल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. पैसा येईल. कौटुंबिक जीवनात भावनिक सुसंवाद राहील.

advertisement

Lucky Colour : Saffron

Lucky Number : 18

शुभांक 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

एखादी व्यक्ती तुमच्यासाठी चिंतेचं कारण बनेल. आज तुमचा मूड चांगला असेल. त्वचेची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. अशावेळी त्वचातज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यावसायिकदृष्ट्या एखादा चांगला प्रस्ताव येऊ शकतो, तो स्वीकारा फायद्याचं ठरेल. प्रेमाच्या बाबतीत तुमच्या मनातील शंका दूर होतील.

advertisement

Lucky Colour : White

Lucky Number : 7

शुभांक 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुम्हाला आज ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून अपेक्षित मदत मिळणार नाही. मुलांकडून एखादी वाईट बातमी मिळू शकते. मालमत्तेची खरेदी पूर्ण करण्यासाठी आज चांगली वेळ आहे. तुमचा लवचिक दृष्टिकोन बदलत्या व्यावसायिक गरजा समजून घेऊन त्यांचा प्रभावीपणे पाठपुरावा करेल. प्रेमाच्या बाबतीत तुमचा मूड चांगला असेल.

Lucky Colour : Black

Lucky Number : 9

वाढदिवसाला केक, बर्थडे पार्टी करताय? या गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवा, वाढेल आयुष्य

शुभांक 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.

आज तुमचं संघटन बांधण्याचा कौशल्य दिसून येईल. तुम्हाला एखादी चिंता दिवसभर सतावेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मेडिकल बिलांवर मोठा खर्च होईल. आर्थिकदृष्ट्या गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराला तुमची वचनबद्धता दाखवण्यासाठी उत्तम दिवस आहे.

Lucky Colour : Red

Lucky Number : 9

शुभांक 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुम्ही यशाचा आनंद घेत असताना तुमच्या डोक्यात यशाची हवा जाणार नाही, याची काळजी घ्या. तुमचा मूड चांगला असेल. आज कारचे नुकसान होऊ शकते. गाडी जपून चालवा. आर्थिकदृष्ट्या शेअर बाजार किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप करावा लागू नये, यासाठी विवाहबाह्य संबंध टाळा.

Lucky Colour : Pink

Lucky Number : 18

शुभांक 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज ऑफिसमध्ये सहकाऱ्याशी किंवा शेजाऱ्याशी भांडण होऊ शकते, काळजी घ्या. आज बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन करू शकता. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या मेडिकल बिलांवर मोठा खर्च होईल. ऑफिसमध्ये काम करताना समस्या उद्भवल्यानं नैराश्य येऊ शकते. जोडीदाराशी आणि भावंडांसोबतचं नातं उत्तम राहील.

Lucky Colour : Blue

Lucky Number : 15

धनाढ्य योग जुळून आलाय! अनेक मार्गांनी या राशींकडे येणार पैसा, गरिबीतून बाहेर

शुभांक 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या स्वभाव अनेकदा वादाचं कारण ठरतो. पण आज कोणत्याही वादात पडू नका. आरोग्य उत्तम राहील. तुमचे कष्ट आणि बुद्धी तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येतील. अविवाहित व्यक्तीची लग्नाची तारीख ठरवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

Lucky Colour : Green

Lucky Number : 17

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Daily Numerology: गुरुवारचा लकी अंक पाहून घ्या! या मूलांकांची गाडी सुसाट धावणार; पैसा येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल