Birthday Tips: वाढदिवसाला केक, बर्थडे पार्टी करताय? या गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवा, वाढेल आयुष्य
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Birthday Astro Tips Marathi: वाढदिवस लोक आपापल्या पद्धतीने साजरा करतात. कोणी मंदिरात जाऊन पूजा करून दान करतो. शुभकार्यक्रम आयोजित करतो. गरिबांना अन्न, कपडे, मिठाई इत्यादींचे काहीजण वाटप करतात.
मुंबई : प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा वाढदिवस खास असतो. लोक आपापल्या पद्धतीने तो साजरा करतात. कोणी मंदिरात जाऊन पूजा करून दान करतो. शुभकार्यक्रम आयोजित करतो. गरिबांना अन्न, कपडे, मिठाई इत्यादींचे काहीजण वाटप करतात. वाढदिवसाला कोणी मित्रांसोबत पार्टी करतो.
सध्याच्या काळात वाढदिवस केक कापून साजरा करण्याचा ट्रेंड आहे. काहींना इच्छा नसूनही मित्र-नातेवाईकांच्या आग्रहास्तव केक कापावा लागतो. तुळशीपीठाचे जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी वाढदिवसानिमित्त लोकांना केक कापण्यास मनाई केली आहे. केक कापल्याने आपलेच नुकसान होते, असे त्यांचे म्हणणे आहे. रामभद्राचार्यांकडून जाणून घेऊ, वाढदिवसाला केक का कापला जाऊ नये? यातून नुकसान काय होते.
advertisement
वाढदिवसाला केक का कापू नये?
रामभद्राचार्य सांगतात की, सध्याच्या काळात लोक वाढदिवस साजरा करताना अनेक चुकीच्या गोष्टी करतात, हजारो दारूच्या बाटल्या फुटतात, केक कापले जातात. चुकीच्या गोष्टींमुळे एखादा 10 वर्षे जगायचा असेल तर 5 वर्षेच जगेल. वाढदिवसाला कधीही केक कापू नये. वाढदिवसासाठी पार्टी करण्याची गरज नाही. त्यांचे म्हणणे असे आहे की, केक कापल्याने आयुर्मान कमी होते.
advertisement
वाढदिवस कसा साजरा करायचा?
रामभद्राचार्य सांगतात की, वाढदिवस साजरा करायचा असेल तर त्या दिवशी आपण सुंदरकांडाचे पठण करावे. हनुमानाच्या कृपेनं आपलं किंवा आपल्या मुलाचं आयुष्य वाढेल. रामभद्राचार्य सांगतात की, तुम्ही तुमचा मुलगा आणि मुलगी दोघांचाही वाढदिवस साजरा करावा. यामध्ये कोणताही भेदभाव होता कामा नये.
मुलाला हे नक्की शिकवा -
मुलांच्या योग्य संगोपनासाठी पालक चिंतेत असतात. त्याला चांगले संस्कार द्यायचे असतात. ते सांगतात, मुलांना रोज श्रीरामाला नमस्कार करायला लावा. अंडी खाणं टाळा. प्रभू श्रीरामाच्या कृपेने आपल्या मुलांचे कल्याण होईल. प्रभू रामाच्या आशीर्वादाने प्रत्येक कामात यश मिळेल. तो प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होईल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 08, 2025 11:14 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Birthday Tips: वाढदिवसाला केक, बर्थडे पार्टी करताय? या गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवा, वाढेल आयुष्य