TRENDING:

पायऱ्यांखाली चुकूनही ठेऊ नका या वस्तू, घरात येईल नकारात्मकता, काय कराल?

Last Updated:

पायऱ्यांखाली काय ठेवावे, काय ठेवू नये, याबाबतही माहिती असणे महत्त्वाचे आहे. पाटणा येथील वास्तू तज्ञ कुमार प्रियवर्धन उर्फ केपी सिंह यांनी याबाबत माहिती दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उद्धव कृष्णा, प्रतिनिधी
फाईल फोटो
फाईल फोटो
advertisement

पाटणा : सनातन धर्मात ज्योतिष शास्त्राचे विशेष महत्त्व आहे. घर दिशा, खिडकी, दरवाजे हे सर्व ज्योतिष शास्त्रावर अवलंबून आहेत. घरात कोणती वस्तू कुठे ठेवायची आहे, कशी ठेवायची आहे, याबाबतची माहिती ही वास्तुशास्त्राच्या माध्यमातूनच मिळते.

याच प्रमाणे पायऱ्यांखाली काय ठेवावे, काय ठेवू नये, याबाबतही माहिती असणे महत्त्वाचे आहे. पाटणा येथील वास्तू तज्ञ कुमार प्रियवर्धन उर्फ केपी सिंह यांनी याबाबत माहिती दिली. नेमकं ते काय म्हणाले, ते जाणून घेऊयात.

advertisement

देशातलं एकमेव गाव जिथे कुणीही खात नाही मटण, पीत नाही दारू, काय आहे हा प्रकार?

लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, पायऱ्यांखाली जागा खाली असते. त्यामुळे लोकं तिथे तुटलेल्या किंवा जुन्या वस्तू ठेऊन देतात. हळूहळू इथे मोठा कचरा जमा होते. यामध्ये भरपूर सामान हा वापरण्यायोग्य नसतो. मात्र, तरीसुद्धा आपण त्याला आळस म्हणा किंवा त्या जुन्या सामानाच्या मोहापायी फेकत नाही.

advertisement

आपल्या सर्वांना माहिती आहे की, नवग्रहांचे आपल्या आयुष्यात विशेष स्थान आहे. नवग्रहांमध्ये एक शनिग्रहाचा लोखंडाशी संबंध असते. त्यामुळे आपल्या घरी जर पायऱ्यांखाली लोखंडाची तूटलेली आणि जूनी वस्तू ठेवली असेल तर आपल्यावर शनिग्रहाचा प्रभाव पडतो. असे केल्याने आपल्या राशीतील शनिग्रह आपल्यावर कोपतो, असेही त्यांनी सांगितले.

extra marital affair : बायकोचे विवाहबाह्य संबंध, नवऱ्याने लावले घरात कॅमेरे, धक्कादायक घटना..

advertisement

केपी सिंह सांगतात की, आपल्या अगदी सोप्या पद्धतीने पायऱ्यांखाली काहीही ठेवायला जागा मिळते. यामुळे त्याखाली लोखंडी वस्तूंशिवाय रिमोट, टीव्ही इत्यादी खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही तिथे ठेवल्या जातात. पण कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या वस्तू पायऱ्यांखाली ठेवू नका. वापरात नसलेल्या वस्तू दुरुस्त करा किंवा फेकून द्या. त्याचा थेट परिणाम आपल्या राहूवर होतो. वास्तुशास्त्रात पायऱ्यांना खूप महत्त्व आहे, असेही ते म्हणाले.

advertisement

वास्तू शास्त्राशी संबंधित तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही +91 91137 32036 या क्रमांकावर केपी सिंह यांच्याशी संवाद साधू शकतात.

सूचना - ही बातमी वास्तू तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत न्यूज18 कोणताही दावा करत नाही.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
पायऱ्यांखाली चुकूनही ठेऊ नका या वस्तू, घरात येईल नकारात्मकता, काय कराल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल