आज 17 फेब्रुवारी 2026 ला वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आहे. महत्त्वाचं म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये. त्यामुळे सुतक पाळण्याची किंवा मंदिरं बंद ठेवण्याची काहीच गरज नाही. तुम्ही तुमची रोजची कामं, पूजा अर्चा नेहमीसारखी करू शकता. हे ग्रहण दक्षिण आफ्रिका आणि अंटार्क्टिका सारख्या भागात दिसणार आहे, तिथेच त्याचे नियम लागू होतील.
advertisement
आजपासून पंचक सुद्धा सुरू होतंय. हे पंचक मंगळवारी सुरू होत असल्यामुळे याला अग्नी पंचक म्हणतात. शास्त्र-पुराणानुसार या दिवसात लाकूडकाम, घराचं छत टाकणं किंवा दक्षिण दिशेला प्रवास करणं टाळलं जातं. पण जर काही कामासाठी बाहेर जायचंच असेल, तर देवाला नमस्कार करून किंवा हनुमान चालीसा वाचून बाहेर पडायला हरकत नाही. या काळात भगवान शिव आणि विष्णूची उपासना करणं चांगलं मानलं जातं.
जाणार एकदाची पिडा! 30 वर्षांनी शनिचा मेष राशीत प्रवेश, या राशींची साडेसाती सुटली
ग्रहण जरी आपल्याकडे दिसणार नसलं, तरी अनेकांना ग्रहण सुटल्यावर घर शुद्ध करायची सवय असते. ग्रहण संपल्यावर घराची साधी साफसफाई करून, पोछा मारताना पाण्यात थोडं मीठ टाकलं की नकारात्मकता जाते असं मानतात. घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात थोडं गंगाजल शिंपडलं किंवा कापूर जाळला की वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं. अन्नामध्ये तुळशीचं पान टाकणं हे आरोग्यासाठीही चांगलं असतं कारण तुळशीत बॅक्टेरिया मारण्याची ताकद असते.
