बुधाच्या पन्ना रत्नाचे फायदे
बुधाच्या पन्ना रत्नाचे आपल्याला अनेक फायदे होतात. या रत्नाला आपण मनी स्टोन देखील असे म्हणतो. पण हे रत्न मिथुन रास आणि कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत चांगलं असतं. त्यासोबत बुध ग्रहाचे शुभांक आहेत त्यांच्यासाठी देखील पन्ना रत्न अत्यंत फायदेशीर आहे. ज्या लोकांची जन्मतारीख ही पाच आहे किंवा त्यांच्या जन्म तारखेमध्ये पाच हा अंक येतो, अशा लोकांसाठी हे रत्न अत्यंत शुभ आणि फलदायी आहे.
advertisement
नीलम रत्न परिधान केल्यानंतर होतो आर्थिक लाभ; कोणत्या राशींसाठी फायदेशीर?
उपरत्नही फलदायी
पन्ना हे रत्न थोडसं महाग भेटतं. बाजारात या रत्नाची उपरत्नं देखील आहेत. ओनेक्स आणि पेरीडॉट हे पन्ना रत्नाचे उपरत्न आहेत. पेरीडॉट या उपरत्नाला मनी रत्न किंवा संपत्ती रत्न देखील म्हटलं जातं. यामध्ये मॅग्नेशियमचे अंश असतात. त्यासोबत लोखंड आणि सल्फरचे देखील अंश या पेरीडॉट उपरत्नामध्ये असतात. ज्यांच्या शरीरामध्ये याची कमतरता असेल हे रत्न परिधान केल्यानंतर त्यांची कमतरता पूर्ण होईल व त्यांचं आरोग्य देखील चांगले राहील. हे रत्न घातल्यामुळे आपली मानसिक स्थिती देखील सुधारते. डिप्रेशन दूर होतं. जर कोणाला डोकेदुखीचा त्रास असेल तर हे रत्न परिधान केल्यामुळे तो सुद्धा नाहीसा होतो, असे कुलकर्णी सांगतात.
घरात शांतता आणि समृद्धी हवीय? ही पाच झाडे एकदा लावून तर पाहा, Video
पती-पत्नीचे वाद मिटतात
जर पती-पत्नीमध्ये कोणते वाद असतील तर हे दोघांनी जर रत्न परिधान केलं तर हे वाद मिटतात. हे रत्न सर्वांनी घातले तर सर्वांना लाभदायी ठरतं. जर तुम्हाला याची टेस्ट घ्यायची असेल तर तुम्ही आधी हे रत्न तुमच्या दंडावरती बांधून त्याचं शुद्धीकरण करून घ्यावं. 'ओम बुध बुधाय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गणपतीचे स्मरण करून आपल्या उजव्या दंडावरचे हा रत्न परिधान करावे. जर याचे तुम्हाला रिझल्ट आले तर हा खडा अंगठी मध्ये घालून करंगळी मध्ये परिधान करावा, असेही ज्योतिषाचार्य कुलकर्णी सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)