घरात शांतता आणि समृद्धी हवीय? ही पाच झाडे एकदा लावून तर पाहा, Video

Last Updated:

घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर ही झाडे फार लाभदायी आहेत.

+
घरात

घरात शांतता आणि समृद्धी हवीय? ही पाच झाडे एकदा लावून तर पाहा, Video

छत्रपती संभाजीनगर, 22 नोव्हेंबर : मानवी जीवनात आणि निसर्गात वनस्पतींचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे अगदी धर्म ग्रंथातही वृक्षवल्लींबाबत लिहलं गेलंय. सध्याच्या काळात वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज बनलीय. मात्र, काही इनडोअर झाडेही आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर ही झाडे फार लाभदायी आहेत, असे छत्रपती संभाजीनगर येथील वनस्पती संशोधक हर्षवर्धन कर्णिक सांगतात.
बर्ड ऑफ पॅराडाईज
बर्ड ऑफ पॅराडाईज हे एक इनडोअर प्लांट आहे. या झाडाची फुले आकारानं एका पक्षासारखी असतात. अत्यंत सुंदर असं या झाडाचा फुल असतं. हे झाड आपण घरात लावल्यानंतर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन भेटतं. पॅराडाईज या शब्दाचा अर्थ असा होता की फक्त तुमच्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी आणि आनंदाचं वातावरण राहील.
advertisement
पिस लिली
पिस लिली म्हणजे शांतता असा याचा अर्थ होतो. या झाडाला पांढऱ्या रंगाची फुले येतात. हे झाड दिसायला अंत्यत सुंदर दिसतं. तसेच कमी पाण्यामध्ये देखील खूप वाढतं आणि याला खूप सुंदर फुले देखील येतात. हे झाड घरामध्ये ऑक्सिजन पुरवठा करते. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घेऊन घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा प्रदान करते, असं कर्णिक सांगतात.
advertisement
लकी बांबू
या झाडाचे वैशिष्ट्य आहे की ते एक दोन मजली असतात किंवा तीन मजल्यांपर्यंत असतं. हे झाड शुद्ध पाण्यामध्ये याची वाढ होते. ते आपल्याला ऑक्सिजन पुरवतं. तसेच हे झाड आपल्या घरात असेल तर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न राहील आणि घरात समृद्धी नांदेल, असं सांगितलं जातं.
advertisement
मनी प्लांट
हे झाड सुद्धा इनडोअर आहे. आपण हे झाड कुंडी किंवा एखाद्या बॉटल मध्ये सुद्धा लावू शकतो. हे झाड घरात आसल्यामुळे पैसा येतो आणि घरात संपन्नता राहते, असं सांगितलं जातं.
स्नेक प्लांट
स्नेक प्लांटला 'मदर ऑफ द प्लांट' देखील म्हणतात. हे झाड घरातली कुठल्याही कोपऱ्यात असले तरी संपूर्ण घरामध्ये शुद्ध ऑक्सीजान पुरवठा करते, असे कर्णक सांगतात.
advertisement
आपणही या झाडांचे फायदे पाहून एखादं झाडं नक्की लावा. विशेष म्हणजे या इनडोअर झाडांना सूर्यप्रकाशाची गरज पडत नाही. तसेच घर प्रसन्न आणि शांत वाटतं, असंही कर्णिक सांगतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
घरात शांतता आणि समृद्धी हवीय? ही पाच झाडे एकदा लावून तर पाहा, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement