उसाचं पाचट जळताना काढला फोटो, 'विंग्ज ऑन फायर' ठरलं जगात भारी Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आठ हजार आठशे फोटोग्राफर म्हणून भेटला पाहिजे पाटील यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार....
छत्रपती संभाजीनगर, 20 नोव्हेंबर : फोटो काढणे ही सुद्धा एक कला आहे. याच कलेच्या जोरावर छत्रपती संभाजीनगर शहरातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर बैजू पाटील यांना नुकताच बेस्ट फोटोग्राफी 'अवॉर्ड ऑफ द इयर' मिळाला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार भेटणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. नुकताच पोर्तुगाल येथील गाला येथे इंटरनॅशनल नेचर अवार्ड सोहळा पार पडला. यामध्ये बैजू पाटील यांना जागतिक स्तरावरील 'एफआयआयएन' पुरस्काराने गौरवण्यात आले.
विंग्ज ऑन फायरला पारितोषिक
बैजू पाटील यांच्या ‘विंग्ज ऑन फायर’ या बर्ड कॅटेगिरीतील ड्रोंगो म्हणजेच कोतवाल पक्ष्याच्या छायाचित्राला जगातील पहिले पारितोषिक मिळाले आहे. आठ हजार आठशे छायाचित्रकारांमधून त्यांना हा प्रथम पुरस्कार भेटलेला आहे. असा पुरस्कार प्रथमच भारताला भेटल्याचे त्यांनी सांगितले. बैजू पाटील यांनी हा फोटो बीड जवळील धारूर या गावात काढलेला आहे. त्यांना हा फोटो काढण्यासाठी तब्बल तीन ते चार वर्षाचा कालावधी लागल्याचे पाटील यांनी सांगितले.
advertisement
पाचट जाळताना काढला फोटो
थंडीमध्ये जेव्हा ऊस तोडल्यानंतर उरलेलं पाचट जाळलं जातं. हे गवत जाळल्यानंतर सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी हा पक्षी येतो. या पक्ष्याला झाडावरून कीटक दिसतात. ते खाण्यासाठी हा पक्षी येतो. तेव्हाचा क्षण कॅमेरात कैद कॅप्चर केला. हा फोटो काढण्यासाठी मला खूप मेहनत लागली. कारण तिथे आजूबाजूला पूर्ण आग होती. त्या आगीमुळे मला झळा लागत होत्या. त्याचबरोबर माझे जे बूट होते त्या बुटाची खालची सोल सुद्धा पूर्ण जळून गेली होती. त्याचबरोबर कॅमेरा सुद्धा माझा खूप गरम होत होता. एवढी मेहनत मला हा एक फोटो काढण्यासाठी लागली होती. हा एक फोटो काढण्यासाठी मी एवढी मेहनत घेतली व या फोटोला जागतिक पुरस्कार भेटला याचा मला खूप जास्त अभिमान आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
advertisement
पुरस्कार भेटल्याचा अभिमान
"मी गेल्या 36 वर्षांपासून या क्षेत्रात काम करतोय. मला हा पुरस्कार भेटला त्याचा खूप आनंद आहे. आपल्या शहराचं, देशाचं नाव जागतिक स्तरावर गेल्यामुळे मला अभिमान आहे. यापुढे देखील असेच छान छान फोटो काढत माझा छंद जोपासणार आहे," असे बैजू पाटील सांगतात.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
November 20, 2023 5:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
उसाचं पाचट जळताना काढला फोटो, 'विंग्ज ऑन फायर' ठरलं जगात भारी Video