नीलम रत्न परिधान केल्यानंतर होतो आर्थिक लाभ; कोणत्या राशींसाठी फायदेशीर?
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
12 राशींसाठी वेगवेगळे विशिष्ट अशी रत्ने देखील उपलब्ध आहेत. या रत्नांमधील नीलम रत्नाचा फायदा कोणत्या राशीला आहे?
ज्योतिष आणि रत्नशास्त्राचं अद्वितीय आणि अतूट असे नाते आहे. नैसर्गिक रित्या उपलब्ध असलेली रत्न ज्योतिष शास्त्रात विशेष मानली जातात. 12 राशींसाठी वेगवेगळे विशिष्ट अशी रत्ने देखील उपलब्ध आहेत. या रत्नांमधील नीलम रत्नाचा फायदा कोणत्या राशीला आहे? याची माहिती आपण पाहणार आहोत. छत्रपती संभाजीनगरमधील ज्योतिषाचार्य उमेश कुलकर्णी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
नीलम रत्न परिधान केल्यानंतर आपल्याला आर्थिक लाभ होतो. आपला भाग्योदय होतो. आयुष्यात शुभ काळ सुरू होतो. विशेषत: ज्यांची जन्मतारीख 4 आणि 8 आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत लाभदायक रत्न आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीचा दोष असेल किंवा शनीची साडेसाती असेल असे लोक सुद्धा हे नीलम रत्न घालू शकतात, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली आहे.
advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ओरिजनल नीलम रत्नांची किंमत ही 9 हजार पासून ते एक लाखापर्यंत आहे. सर्वांनाच हे महागडे रत्न वापरणे परवडत नाही. त्यामुळे जामुनिया, निली, बॅक ऑफ नीलम, स्मोक स्टोन , सुलेमानी हकीक हे नीलमचे प्रमुख उपरत्न आहेत. त्यांनी उपरत्न परिधान करावी. ही त्यांच्या बजेटमध्ये बसणारी आहेत, असं कुलकर्णी यांनी सांगितलं.
advertisement