मुंबई : नवीन वर्ष 2026 सुरू होण्यास आता काहीच दिवस शिल्लक राहिले असून, या वर्षात अनेक महत्त्वाचे ग्रहयोग निर्माण होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे वर्ष मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली राहणार असून, वर्षाच्या सुरुवातीलाच सूर्य आणि मंगळ यांची प्रभावी युती तयार होणार आहे. द्रिक पंचांगानुसार, 14 जानेवारी 2026 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, तर अवघ्या चार दिवसांनी म्हणजे 18 जानेवारी 2026 रोजी मंगळ ग्रहही मकर राशीत प्रवेश करणार आहे. या दोन तेजस्वी ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे ‘विस्फोटक राजयोग’ निर्माण होणार असून, त्याचा परिणाम काही राशींवर नकारात्मक स्वरूपात दिसून येऊ शकतो.
advertisement
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, सूर्य-मंगळ युतीमुळे निर्माण होणारा हा योग स्वभावात आक्रमकता, निर्णयांतील घाई आणि संघर्ष वाढवणारा मानला जातो. जेव्हा हा योग कुंडलीत किंवा गोचरात सक्रिय होतो, तेव्हा व्यक्तीला मानसिक तणाव, आर्थिक अडचणी आणि नातेसंबंधांतील ताण यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही राशींनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
मेष रास
मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे सूर्य-मंगळ युतीचा परिणाम या राशीवर अधिक तीव्र राहू शकतो. या काळात करिअरशी संबंधित निर्णय घेताना घाई टाळणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारात जोखीम वाढू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता असून, रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल. संयम आणि समजूतदारपणा ठेवला तर नुकसान टाळता येईल.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मनावरील ताण वाढू शकतो आणि लहानसहान गोष्टींवरून चिडचिड होऊ शकते. कार्यालयीन वातावरणात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्यास विलंब होईल. या काळात शांत राहून नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहू शकते.
मिथुन रास
मिथुन राशीच्या व्यक्तींना मानसिक अस्थिरता जाणवू शकते. नातेसंबंधांमध्ये संशय आणि गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट आखूनच पैसे खर्च करावेत. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.
सिंह रास
सिंह राशीसाठी सूर्य-मंगळ युती करिअरच्या दृष्टीने अडचणी निर्माण करू शकते. कामाच्या ठिकाणी दबाव वाढेल आणि सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. आत्मसन्मान जपताना अहंकार टाळणे महत्त्वाचे ठरेल. संयमाने परिस्थिती हाताळल्यास अडथळे दूर होऊ शकतात.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात थोडी संवेदनशील ठरू शकते. मानसिक तणाव, अनावश्यक खर्च आणि आत्मविश्वासात चढ-उतार जाणवतील. कामात अडथळे येऊ शकतात, मात्र सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास परिस्थिती सुधारू शकते.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
