TRENDING:

Strawberry Jam Recipe : घरातील सगळेच खातील आवडीने, हिवाळ्यात बनवा स्ट्रॉबेरी जॅम, रेसिपीचा संपूर्ण Video

Last Updated:

हिवाळा म्हटले की मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी येत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्ट्रॉबेरी खायला खूप आवडते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : हिवाळा म्हटले की मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी येत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्ट्रॉबेरी खायला खूप आवडते. स्ट्रॉबेरी पासून वेगवेगळे पदार्थ करतात. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे स्ट्रॉबेरी जॅम. लहान मुलांना खूप असा आवडतो पण विकतच्या जॅममध्ये मोठ्या प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह असतात. पण आपण घरी जॅम करणार आहोत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी कमी साहित्यामध्ये तयार करणार आहोत. तर याची रेसिपी बघू.
advertisement

‎ स्ट्रॉबेरी जॅम साहित्य

200 ग्रॅम फ्रेश स्ट्रॉबेरी, पाऊण वाटी गूळ, आणि 1 चमचा लिंबाचा रस एवढेच साहित्य याकरता लागणार आहे.

जालन्यातील शाळेचा डिजिटल डिटॉक्स पॅटर्न! या गावात 2 तास मोबाईल आणि टीव्ही राहणार बंद

स्ट्रॉबेरी जॅम कृती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
12 वर्षांपूर्वी घेतला निर्णय, शेतकरी करतोय आता फायद्याची शेती, लाखोंचे उत्पन्न
सर्व पहा

‎सगळ्यात पहिले एका पॅनमध्ये स्ट्रॉबेरी टाकून घ्यायचे आहेत. त्याला एकदम मऊसूद होऊ द्यायचे आहे. आता ह्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे. ह्याला देखील शिजवून घ्यायचे आहे. मऊ झाले की त्याला स्मॅश करून घ्यायचे आहे. ह्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं. साधारणपणे 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. एकदम असा थीक होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. स्ट्रॉबेरी जॅम बनवून तयार होतो. ह्याला तुम्ही काचेच्या बरणीत 15 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Strawberry Jam Recipe : घरातील सगळेच खातील आवडीने, हिवाळ्यात बनवा स्ट्रॉबेरी जॅम, रेसिपीचा संपूर्ण Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल