रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी फायदेशीर, घरीच करा पौष्टिक सुरणाचे काप, रेसिपीचा Video
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Mohan Najan
Last Updated:
भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स असते त्यामुळे ते पचनास मदत करून रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
ठाणे : सुरण ही अत्यंत पौष्टिक आणि औषधी कंदमुळे आहे, जी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यात भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स असते त्यामुळे ते पचनास मदत करून रोगप्रतिकारशक्ती वाढवते. विशेषतः मूळव्याध आणि संधिवाताच्या तक्रारींवर रामबाण उपाय म्हणून काम करते. सुरण हा बहुतांश लोकांनाच न आवडणारा कंद आहे. आज आपण सुरणाचे काप वरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट असे सुरणाचे काप बनवणार आहोत, जे लहान मुले देखील आवडीने खातील.
सुरणाचे साहित्य
सुरण - 250 ग्रॅम, हळद, धनेपूड, मसाला, आले-लसूण पेस्ट (आवश्यतेनुसार), चिंच हे साहित्य लागेल.
सुरणाचे काप बनवण्याची कृती
तयारी: सुरण स्वच्छ धुवून, साल काढून मध्यम जाडीचे गोल काप करा. हे काप उकळवून घेतले तरी चालतील किंवा 10-15 मिनिटे चिंचेचे पाणी किंवा लिंबाच्या रसात भिजवून ठेवले तरी उत्तम, जेणेकरून खाज सुटणार नाही.
advertisement
मसाला: कापांना लाल तिखट, हळद, आले-लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ लावून 15 मिनिटे मॅरीनेट करा.
कोटिंग: तांदळाचे पीठ आणि रवा एकत्र करून त्यात काप घोळवा, ज्यामुळे काप कुरकुरीत होतात.
भाजणे: पॅनवर तेल किंवा तूप गरम करून काप मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा.
महत्त्वाच्या टिप्स:
खाजरापणा टाळणे: सुरण खाजरे असू शकते, त्यामुळे काप तळण्यापूर्वी ते चिंचेच्या पाण्यात उकळणे किंवा लिंबाचा रस लावणे आवश्यक आहे.
advertisement
कुरकुरीतपणा: तांदळाच्या पिठासोबत रवा वापरल्यास काप जास्त कुरकुरीत होतात.
हे काप गरमागरम वरण-भात किंवा डाळ-खिचडीसोबत अतिशय चविष्ट लागतात.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 3:07 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी फायदेशीर, घरीच करा पौष्टिक सुरणाचे काप, रेसिपीचा Video






