Kolambi Bhat Recipe : हॉटेलसारखी चव, घरीच बनवा सोप्या पद्धतीने कोळंबी भात, रेसिपीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
आज आपण घरगुती साहित्यात तेही फक्त 30 मिनिटात कोळंबी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत. ही एक चविष्ट आणि स्वादिष्ट डिश आहे.
कल्याण : कोळंबी म्हटले की ते वेगवेगळ्या पद्धतीत बनवण्याचा प्रयत्न आपण करतो जसे की कोळंबी फ्राय, कोळंबी भाजी आणि कोळंबी रस्सा अशा अनेक पद्धतीने आपण कोळंबी बनवतो. परंतु आज आपण घरगुती साहित्यात तेही फक्त 30 मिनिटात कोळंबी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत. ही एक चविष्ट आणि स्वादिष्ट डिश आहे. हॉटेलसारखी चव आणणारी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत कोळंबी भात रेसिपी बनवू.
कोळंबी भात साहित्य
1 किलो तांदूळ, 80 ग्रॅम स्वच्छ कोळंबी, दही, 4 चमचे तेल किंवा लोणी, लसूण पाकळ्या, 1/2 चमचा आले-लसूण पेस्ट, 1 हिरवी मिरची (चिरलेली), कांदा, बारीक चिरलेला कांद्याची पात, गाजर, फरसबी, ढोबळी मिरची (आवश्यकतेनुसार), 6 चमचे घरगुती मसाला, खडे मसाले, मीठ (चवीनुसार) हे साहित्य लागेल.
advertisement
कोळंबी भात कृती
कोळंबी तयार करणे: कोळंबी स्वच्छ धुवून त्यात थोडे मीठ, आले-लसूण पेस्ट आणि दही घालून 1 तास मॅरीनेट करा.
कुकरमध्ये तेल गरम झाले की आले-लसूण पेस्ट, कांदा, लालसर होईपर्यंत परता.
नंतर साहित्यात दिलेले सर्व मसाले टाकणे.
कोळंबी गुलाबी होईपर्यंत (2-3 मिनिटे) परता.
भाजी परता: त्याच कढईत लसूण, हिरवी मिरची आणि कांदा परता. त्यानंतर इतर बारीक चिरलेल्या भाज्या टाकून मोठ्या आचेवर 5 मिनिटे परता.
advertisement
थोड्या वेळाने तांदूळ टाकणे आणि भात शिजवायला पाणी लागतो त्या प्रमाणात पाणी घालणे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत भात शिजवणे. चवीपुरते मीठ घाला आणि वरून बारीक केलेली कोथिंबीर टाका. भात रेडी.
सर्व्ह करा: गरम गरम प्रॉन्स फ्राईड राईस सर्व्ह करा.
टीप:
फ्राईड राईससाठी नेहमी बासमती तांदूळ किंवा मोकळा शिजलेला भात वापरा. शक्यतो राईस न शिजवल्यास प्रॉन्ससोबत टाकले तरी होईल.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 3:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kolambi Bhat Recipe : हॉटेलसारखी चव, घरीच बनवा सोप्या पद्धतीने कोळंबी भात, रेसिपीचा Video






