मेष - वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या मुलींची राशी मेष आहे, त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण अद्भूत असतो. त्यांचा राग खूप तीव्र असतो. या राशीच्या मुली नेहमीच सर्वांवर वर्चस्व गाजवतात. त्यांच्या पुढे कोणी गेलेलं चालत नाही. निर्भय स्वभाव असतो.
तसेच या मुली कोणाच्याही दबावाखाली काम करत नाहीत. त्यांना स्वतंत्र राहायला आवडतं. त्यांच्याकडे एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची क्षमता असते, म्हणजे त्या बहुगुणसंपन्न असू शकतात. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, तोच त्यांना हे गुण देतो.
advertisement
संकटात कोणी हात दिला नाही! या राशींचे आता नशीब उजळणार; भाग्योदय जवळ आलाय
मिथुन - या राशींच्या मुली मनी माइंडेड असतात. आयुष्यात त्या एक चांगल्या बॉस असल्याचे सिद्ध करतात. त्यांच्यात उत्तम नेतृत्वगुण असतात. त्यांच्यात काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असते. तसेच त्या खूप सर्जनशील आहेत.
त्यांना नवीन गोष्टी शिकायला आवडतात. शिवाय, त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास असतो. वाणी-बोलणे खूप प्रभावी असते. त्यामुळे समोरची व्यक्ती लवकर प्रभावित होते. या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, तो त्यांना हे गुण देतो.
सिंह - ज्योतिषशास्त्रानुसार ज्या मुलींची राशी सिंह आहे, त्यांच्याकडे उत्तम नेतृत्व क्षमता असते. ती एक चांगली नेताही बनून यशस्वी होऊ शकते. एखादं काम हातात घेतलं की, ते पूर्ण करूनच श्वास घेण्याची त्यांना सवय असते. सिंह राशीच्या मुलींचे मनोबलही मजबूत असते. स्वतः काम करण्याबरोबरच इतरांकडून काम कसे करून घ्यायचे हे देखील त्यांना माहिती आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच चमक असते. या राशीचा स्वामी सूर्य देव आहे, तो त्यांना हा गुण देतो.
शनिवारी या मंत्रांचा जप करणं शुभ फळदायी; शनिदेव कृपा करतात, संकटे टळतील
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
