नाडी दोषाचे नाव ऐकताच वाढतं टेन्शन - कुंडली मिलन करताना 36 गुणांपैकी नाडी दोषाचे नाव निघाले की, दोन्ही कुटुंबात काळजी वाढते. अनेकदा चांगले स्थळ असूनही केवळ नाडी दोषामुळे लग्न मोडले जाते. नाडी दोषाचा संबंध आरोग्याशी आणि विशेषतः होणाऱ्या अपत्याशी जोडला जातो. याचा मुख्य उद्देश केवळ गुणांची संख्या पाहणे नसून वर-वधू मधील मानसिक, भावनिक आणि शारीरिक ताळमेळ तपासणे हा असतो. याद्वारे आरोग्य, संतती सुख आणि आर्थिक स्थैर्य याचा अंदाज लावला जातो.
advertisement
नाडी म्हणजे काय - एकूण 36 गुणांपैकी नाडीला 8 गुण दिले गेले आहेत, जे इतर कोणत्याही गुणापेक्षा जास्त आहेत. नाडीचे तीन प्रकार असतात: आदि नाडी, मध्य नाडी आणि अंत नाडी. मुलगा आणि मुलगी या दोघांचीही नाडी एकच असेल, तर त्याला नाडी दोष असे म्हणतात.
नाडी दोष अशुभ का मानला जातो - मान्यतेनुसार, नाडी दोष असल्यास लग्नानंतर आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात किंवा संतती प्राप्तीत अडचणी येऊ शकतात. तसेच जोडीदारांमध्ये मानसिक तणाव आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असते. आजच्या ज्योतिषांच्या मते, केवळ नाडी दोषावरून लग्न नाकारणे योग्य नाही. कुंडलीतील इतर ग्रहांची स्थिती आणि योग देखील महत्त्वाचे असतात. अनेक वेळा नाडी दोष असूनही वैवाहिक जीवन सुखाचे असू शकते.
'बिन लग्नाचा' शिक्का कधी पुसला जाणार? लग्नगाठ जुळण्यासाठी महाशिवरात्रीचा महाउपाय
नाडी दोष कधी लागू होत नाही - ज्योतिषशास्त्रात काही अपवाद सांगितले आहेत. जर मुलगा-मुलगी यांचे नक्षत्र एकच असेल पण चरण वेगळे असतील, तर दोषाचा प्रभाव कमी होतो. राशी एकच असून नक्षत्र वेगळे असतील तरीही नाडी दोष सौम्य मानला जातो.
नाडी दोषासाठी उपाय -
कुंडलीत नाडी दोष असेल, तर त्याचे परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप करणे, गरजू व्यक्तींना धान्य किंवा कपड्यांचे दान करणे, गोसेवा करणे आणि नियमितपणे दान-पुण्य केल्याने मानसिक शांती मिळते आणि दोषाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.
