TRENDING:

हातावरील 'या' खास रेषा उघडतात धन-संपत्तीच द्वार, पैशांचा होतो वर्षाव; तुमचाही हातावर आहेत का?

Last Updated:

हस्तरेषाशास्त्रानुसार, आपल्या तळहातावरील रेषा केवळ नशीबच सांगत नाहीत, तर भविष्यातील आर्थिक स्थितीचा आरसाही असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Palmistry : हस्तरेषाशास्त्रानुसार, आपल्या तळहातावरील रेषा केवळ नशीबच सांगत नाहीत, तर भविष्यातील आर्थिक स्थितीचा आरसाही असतात. अनेकदा आपण कठोर परिश्रम करतो, पण यश मिळत नाही; अशा वेळी आपल्या हातातील 'धन रेखा' आणि काही शुभ चिन्हे आपली साथ देतात. हस्तरेषा तज्ज्ञांच्या मते, ज्यांच्या हातात काही विशेष खुणा असतात, त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते.
News18
News18
advertisement

धन रेषा कुठे असते?

हस्तरेषा शास्त्रानुसार, करंगळीच्या खालच्या भागाला 'बुध पर्वत' म्हणतात. या पर्वतावर असणारी उभी रेषा 'धन रेखा' मानली जाते. जर ही रेषा स्पष्ट, खोल आणि न तुटलेली असेल, तर ती व्यक्ती व्यवसायात किंवा गुंतवणुकीत प्रचंड पैसा कमावते.

भाग्य रेषेचे महत्त्व

मनगटापासून सुरू होऊन थेट मधल्या बोटापर्यंत जाणारी रेषा म्हणजे 'भाग्य रेखा'. ही रेषा जितकी सरळ आणि निर्दोष असेल, तितके त्या व्यक्तीचे नशीब बलवान असते. अशा लोकांना कमी मेहनतीत अधिक यश आणि वारसाहक्काने संपत्ती मिळण्याचे योग असतात.

advertisement

तळहातावर 'M' आकाराचे चिन्ह

जर तुमच्या तळहातावरील जीवनरेषा, मस्तक रेखा आणि भाग्य रेखा मिळून 'M' हा आकार तयार होत असेल, तर तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. असे मानले जाते की, ज्यांच्या हातात 'M' चिन्ह असते, ते वयाच्या 35-40 नंतर अफाट संपत्तीचे मालक बनतात.

'V' चिन्हाची जादू

तर्जनी आणि मधल्या बोटाच्या मध्ये जर 'V' आकाराचे चिन्ह तयार होत असेल, तर ती व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करणारी असते. अशा लोकांचे नशीब वयाच्या पस्तीशीनंतर चमकते आणि ते समाजात उच्च पद, मान-सन्मान प्राप्त करतात.

advertisement

मासा आणि स्वस्तिक चिन्ह

तळहाताच्या खालच्या बाजूला जर माशासारखे चिन्ह असेल, तर त्या व्यक्तीला धार्मिक कार्यातून आणि परदेश प्रवासातून धनलाभ होतो. तसेच, तळहातावर स्वस्तिक चिन्ह असणाऱ्या व्यक्तींवर साक्षात सरस्वती आणि लक्ष्मीची कृपा असते.

शुक्र पर्वताची स्थिती

अंगठ्याच्या खालच्या फुगीर भागाला 'शुक्र पर्वत' म्हणतात. हा भाग जर उंच आणि स्पष्ट असेल, तर ती व्यक्ती विलासी जीवन जगते. अशा लोकांकडे गाडी, बंगला आणि सर्व भौतिक सुखसोयींची कधीही कमतरता भासत नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
12 वर्षांपूर्वी घेतला निर्णय, शेतकरी करतोय आता फायद्याची शेती, लाखोंचे उत्पन्न
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
हातावरील 'या' खास रेषा उघडतात धन-संपत्तीच द्वार, पैशांचा होतो वर्षाव; तुमचाही हातावर आहेत का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल