ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे फुलांची झाडे सडली आणि खराब होऊन जवळपास 2 लाख रुपयांचे नुकसान तेव्हा झाले. मात्र तरीदेखील 4 लाख रुपये हे समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे. या झाडांना साडेचार फुटाचा बेड काढून सव्वा फुटावर झाडांची लागवड केली आहे. तसेच ड्रीपद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे. वेळोवेळी आणि गरजेनुसार या फुलझाडांना पाणी देण्यात येते, असे देखील पाटील यांनी म्हटले आहे.
advertisement
नवीन शेतकऱ्यांनी फुलशेती कशी करावी?
नवीन शेतकऱ्यांना किंवा तरुणांना फुलशेती या व्यवसायात उत्पादन घ्यायचे झाल्यास सुरुवातीच्या काळात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे, नियोजन आखणी करावी तसेच मात्र यासाठी जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. या फुलशेतीसाठी शेणखताचा वापर करावा याबरोबरच बारा-61, चौदा-48, दहा-40 दहा या रासायनिक खतांचा वापर करावा, फवारणीमध्ये कॅब्रीटॉक, डेलिगेट, कोरोजन या औषधांची फवारणी करावी.





