वृषभ : आजचा दिवस खूप उत्साहवर्धक असेल. कारण कोणी तरी खूप खास व्यक्ती अधिक जवळ येईल आणि तुमची रिलेशनशिप गंभीर वळण घेऊ शकेल. प्रेम मिळाल्यामुळे तुम्हाला खूप आनंदाचे क्षण अनुभवता येतील; मात्र असुरक्षितता वाटू न देणं तुमच्या हिताचं आहे. स्वतःचं त्यापासून संरक्षण करा. त्याचा तुमच्या रिलेशनशिपवर परिणाम होऊ देऊ नका.
advertisement
मिथुन : तुमच्यासाठी कोण पर्फेक्ट पार्टनर बनेल याची कल्पना करण्याऐवजी आज रिलेशनशिपवर फोकस करा. तुमच्या मनात पर्फेक्ट म्हणून ज्यांची प्रतिमा आहे, त्यांच्याशी सतत तुमच्या जोडीदाराची तुलना करत राहिल्यास तुमच्या रिलेशनशिपचा तोटा होईल. आपण सगळेच चुका करतो आणि प्रत्येकात काही ना काही वैगुण्य आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला प्रेमळ जोडीदार हवा आहे, कोणी काल्पनिक सुपरहिरो नकोय.
कर्क : रिलेशनशिपमध्ये रोमँटिकपणा वाढण्यासाठी तुम्ही जोडीदाराला चांगला मेसेज पाठवायला हवा. त्यामुळे रिलेशनशिप पुढे नेण्याची तुमची इच्छा त्या व्यक्तीला समजेल. तसंच, रोमँटिक बंध अधिक दृढ होतील. जे काही कराल, ते सिन्सिरिटीने, मात्र सरप्राइजसह करा. केवळ प्रिय व्यक्तीला ऐकायचं आहे असं तुम्हाला वाटतं म्हणून काही लिहिण्यापासून स्वतःला रोखा.
सिंह : तुमच्या विवाहित मुलांच्या नात्यात तुमची मर्यादा किती यावर आज तुम्ही काम कराल. आपण फक्त प्रेमाने सल्ला देतो, आपला हेतू चांगला आहे असं तुम्हाला वाटेल; मात्र तुमच्या हस्तक्षेपाचा नकारात्मक परिणाम तुमच्या मुलांवर होत आहे. तुमच्या मुलांच्या लग्नाच्या बाबतीत थोडं आदराचं अंतर राखायचा प्रयत्न करा.
कन्या : तुमची रिलेशनशिप किती वेगाने पुढे जाईल किंवा किती दूरपर्यंत जाईल याबद्दल खात्री नसेल, तर कुटुंबीय किंवा जवळच्या मित्राचा सल्ला घ्यायला हवा. हा सल्ला तुमचं पूर्णपणे हित चिंतूनच दिलेला असेल याबद्दल खात्री बाळगावी.
तूळ : रोमँटिक जीवनात तुम्ही आणि जोडीदार किंवा जोडीदार आणि तुमचे आई-वडील यांच्यात उद्भवणाऱ्या काही मुद्द्यांबद्दल सावध राहा. गैरसमज किंवा किरकोळ वाद उद्भवू शकतात. त्यामुळे घराचं संतुलन बिघडू शकतं. सारं काही सुरळीत होण्यासाठी वेळ घ्या.
जरा नव्हे 7 वर्ष डोक्याला शांती नव्हती! या राशींवरून साडेसाती हटणार, आनंद परतणार
वृश्चिक : आजचा दिवस तुमच्या संयमाची परीक्षा पाहील. तुम्हाला अस्वस्थ आणि त्रासदायक वाटत आहे. नेहमीप्रमाणेच शांत राहा. जोडीदाराशी सखोल संवाद साधा.
धनू : प्रेमजीवनात अलीकडेच घडलेल्या काही वादांमुळे आणि गैरसमजांमुळे आज थोडंसं डिप्रेस्ड वाटेल. हा वेदनादायी काळ तात्पुरता आहे. काही वेळा रिलेशनशिप्समध्ये काही कडवटपणा येतो; मात्र आगामी काळात खरे मित्र आणि प्रिय व्यक्ती तुमच्यासोबत असतील, हे विसरू नका.
मकर : रोमान्सच्या बाबतीत सावध राहायला हवं. वादांची शक्यता आहे. जोडीदारा वाईट मूडमध्ये असला, तर सावध राहायला हवं. गोष्टी आहेत त्यापेक्षा अधिक वाईट करू नका. मृदू राहा. काळजी घ्या आणि तुम्ही दिवस सहज पार पाडाल.
कुंभ : रोमँटिक जीवनातला ताण थोडा कमी झाल्याने दिलासा मिळेल. तुम्हाला त्या परिस्थितीतून काय मिळालं आणि तुम्ही त्यात कसे गेला होतात याचा विचार करायला हवा. भविष्यात चांगली निवड कराल. स्वतःच्या बाबतीत खूप कठोर राहू नका. कारण चुका आपण सगळेच करतो. त्यांचे वाद ऐकून घ्या, तुमची बाजू स्पष्टपणे मांडा, त्यात विनाकारण कोणत्याही भावना आणू नका.
संकष्ट चतुर्थीच्या पूजेत वापरावी ही फुले; अशी करावी विधीपूर्वक पूजा-उपासना
मीन : घरात काही अस्वस्थता असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपेक्षित सलोखा तयार होत नाही. तुमच्या जोडीदाराच्या निवडीला कुटुंबीयांचा पाठिंबा नाही असं तुम्हाला वाटत असेल. त्यामुळे थोडा कडवटपणा तयार होईल. ही नकारात्मकता टाळा. कारण तुमचं कुटुंब त्यांच्या मते तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते करत आहे. त्यांचे मुद्दे ऐकून घ्या. तुमची बाजू विनाकारण भावनिक न होता स्पष्टपणे मांडा.