Sankasht Chaturthi 2025: संकष्ट चतुर्थीच्या पूजेत वापरावी ही फुले; अशी करावी विधीपूर्वक पूजा-उपासना

Last Updated:

Sankasht Chaturthi 2025 Date and Time: पंचांगानुसार, या वर्षी संकष्ट चतुर्थीचा सण शुक्रवार, 17 जानेवारी रोजी साजरा केला जाईल, या काळात सौभाग्य योग तयार होत आहे. मघा नक्षत्रावर बाव, बलव करण यांचे संयोजन उत्तम असेल.

Sankasht Chaturthi 2025: संकष्ट चतुर्थीच्या पूजेत वापरावी ही फुले; अशी करावी विधीपूर्वक पूजा-उपासना
Sankasht Chaturthi 2025: संकष्ट चतुर्थीच्या पूजेत वापरावी ही फुले; अशी करावी विधीपूर्वक पूजा-उपासना
मुंबई : दर महिन्यात संकष्ट चतुर्थीचे व्रत साजरे होते. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला सर्व दिवसांमध्ये विशेष स्थान आहे. कारण या दिवशी संकष्ट चतुर्थी साजरी होते. धार्मिक मान्यतेनुसार, संकष्ट चतुर्थी हा गणेशाच्या पूजेसाठी समर्पित दिवस आहे. या दिवशी लोक गणेशाची पूजा करून संकष्टीचा उपवासही करतात. चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो.
पंचांगानुसार, या वर्षी संकष्ट चतुर्थीचा सण शुक्रवार, 17 जानेवारी रोजी साजरा केला जाईल, या काळात सौभाग्य योग तयार होत आहे. मघा नक्षत्रावर बाव, बलव करण यांचे संयोजन उत्तम असेल. या योगात गणपतीची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानले जाते. शक्यतो संकष्ट चतुर्थीची पूजा नेहमीच पूर्ण साहित्याने विधीपूर्वक करावी; यामुळे उपवासाचे पूर्ण फायदे मिळण्याची शक्यता वाढते. व्रताच्या पूजा साहित्याबद्दल तसेच गणपतीच्या आवडत्या फुलांबद्दल आणि रंगाबद्दल जाणून घेऊया.
advertisement

संकष्ट चतुर्थी पूजा साहित्य यादी -

गंगाजल
गणपतीची मूर्ती/फोटो
लाल फुले
लाकडी पाट/चौरंग
वेलची
21 पेंड्या दुर्वा
पिवळे कापड
पंचरंगी धागा
सुपारी
नारळ
लवंग
गाईचे दूध
दिवा
गुलाल, इत्यादी
11 किंवा 21 तिळाचे लाडू
मोदक
फळे
संकष्ट चतुर्थी व्रत कथा पुस्तक
साखर
हळद
अत्तर
सिंदूर
चंद्राला अर्पण करण्यासाठी दूध
कलश
advertisement

गणपतीची आवडती फुले -

धार्मिक मान्यतेनुसार, संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाच्या आवडत्या फुलांचा वापर केल्याने इच्छित परिणाम मिळतात. पूजेमध्ये जास्वंदी फुले, झेंडूचे फुले आणि लिलीचे फूल समाविष्ट करू शकता. ही गणेशाला खूप प्रिय मानली जातात. तुम्ही कदंब फुले, पारिजात किंवा हरसिंगार फुले देखील वापरू शकता. श्री गणेशाला लाल, हिरवा आणि पिवळा रंग खूप आवडतो. पूजेदरम्यान या रंगांचे कापड वापरणे अत्यंत शुभ मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Sankasht Chaturthi 2025: संकष्ट चतुर्थीच्या पूजेत वापरावी ही फुले; अशी करावी विधीपूर्वक पूजा-उपासना
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement