MUM vs HAR : 25 फोर 12 सिक्स, मुंबईच्या बॉलर्सची बेक्कार धुलाई! पुण्यात मुलानी-ठाकूर-देशपांडे सगळे फेल
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Syed Mushtaq Ali Trophy : मुंबईच्या एकाही प्रमुख बॉलर्सला आपला प्रभाव पाडता आला नाही, ज्यामुळे त्यांच्या खराब परफॉरमन्समुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Mumbai vs Haryana : सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईचे गोलंदाज एका महत्त्वपूर्ण मॅचमध्ये हरियाणाच्या (Haryana) बॅटरसमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरले. हरियाणाच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीचा अक्षरशः समाचार घेतला, ज्यामुळे निर्धारित 20 ओव्हरमध्ये हरियाणाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 234 रन्सचा प्रचंड स्कोर उभा केला. त्याला प्रत्युत्तर देताना यशस्वी जयस्वालने मुंबईला तारलं अन् विजयाच्या उंभरठ्यावर पोहोचवलं.
मुंबईच्या बॉलर्सची धुलाई
पुण्याच्या डीवाय पाटील अकॅडमीमध्ये मुंबई आणि हैदराबाद यांच्यात मॅच खेळवली गेली. या मॅचमध्ये मुंबईच्या एकाही प्रमुख बॉलर्सला आपला प्रभाव पाडता आला नाही, ज्यामुळे त्यांच्या खराब परफॉरमन्समुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मुंबईच्या संघात तुषार देशपांडे, कॅप्टन शार्दुल ठाकूर आणि शाम मुलानी यांसारखे प्लेयर्स असतानाही हरियाणाने मोठा स्कोर केला.
advertisement
तुषार देशपांडेंसह सगळेच फेल
हरियाणाच्या बॅटिंगच्या वादळात मुंबईचे सर्व गोलंदाज भरडले गेले. एकाही गोलंदाजाला 9 रन्स प्रति ओव्हरच्या आत इकॉनॉमी रेट ठेवता आले नाही. तुषार देशपांडे याने 4 ओव्हरमध्ये सर्वाधिक 52 रन्स दिले. त्याला कोणतीही विकेट्स मिळाली नाही, तर त्याचा इकोनॉमी रेट 13.00 होते. सूर्यांश शेडगे आणि अंकोलेकर यांनीही निराशा केली. सूर्यांशने 2 ओव्हरमध्ये मध्ये 26 रन्स दिले (इकोनॉमी रेट 13.00), तर अंकोलेकरने 3 ओव्हरमध्ये 46 रन्स दिले.
advertisement
साईराज पाटीलला दिलासा
या हाय स्कोरिंग मॅचमध्ये साईराज पाटील हा एकमेव मुंबईचा बॉलर होता, ज्याला थोडी दिलासा मिळाली. त्याने 4 ओव्हरमध्ये 44 रन्स देत 2 विकेट्स मिळवल्या, पण त्याचाही इकोनॉमी रेट 11.00 राहिला. शार्दुल ठाकूरने 4 ओव्हरमध्ये 37 रन्स दिले आणि पण विकेट मिळाली नाही. एकंदर, मुंबईच्या बॉलर्सकडून एकही प्रभावी स्पेल पाहायला मिळाला नाही, ज्यामुळे मॅच हरियाणाच्या बाजूने झुकला आणि मुंबईला 235 रन्सचे मोठं टार्गेट मिळालं.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 14, 2025 12:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MUM vs HAR : 25 फोर 12 सिक्स, मुंबईच्या बॉलर्सची बेक्कार धुलाई! पुण्यात मुलानी-ठाकूर-देशपांडे सगळे फेल











