मंगळ दोषाचे अशुभ परिणाम
मंगळ हा धैर्य, शौर्याचा कारक मानला जातो. मंगळ शुभ असेल तर ती व्यक्ती धाडसी आणि निर्भय असते. पण जर मंगळ अशुभ स्थितीत गेला तर व्यक्ती रागीट आणि अहंकारी बनते, अति उत्साहीपण वाढतो आणि सतत घाई करतो. तसेच त्याला वैवाहिक जीवनात समस्या येतात, वैवाहिक आनंद मिळत नाही, सासरच्यांशी संबंध बिघडतात, अपघात किंवा आरोग्याशी संबंधित समस्या येण्याची शक्यता असते. करिअरमध्ये अडचणी येतात. या सर्वांपासून दिलासा मिळवण्यासाठी काही उपाय करावेत.
advertisement
तुमच्या कपाळावर पण इतक्या आट्या पडतात का? संख्येचा नशीब उजळण्याशी असा संबंध
मंगळ दोष दूर करण्यासाठी उपाय -
- मंगळ दोषापासून दिलासा मिळविण्याचा सर्वोत्तम आणि प्रभावी उपाय म्हणजे हनुमानाची पूजा करणे. मांगलिक लोकांनी दररोज हनुमान चालीसा पठण करावे. यासाठी हनुमानाचा फोटो देव्हाऱ्यात किंवा शांत ठिकाणी ठेवा. देशी तुपाचा दिवा लावून कमीत कमी ३ वेळा हनुमान चालीसा पठण करावे. यामुळे राग आणि ताण कमी होतो. मानसिक शांती मिळते.
- मंगळ दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी, चंदनाच्या माळेने 'ॐ अंगारकाय नम:' या मंत्राचा जप करा.
- देवाला गुलाब किंवा जास्वंद सारखी लाल फुले अर्पण करा. जेणेकरून मंगळाची ऊर्जा सकारात्मक राहील.
- मंगळाशी संबंधित वस्तू जसे की गूळ आणि गहू दान करा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात.
- मंगळ यंत्राची पूजा केल्यानेही अनेक फायदे होतात.
ज्याची भीती होती तेच! राहु-मंगळाचा संयोग संकटे वाढवणार, या 4 राशींचं मोठं नुकसान
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
