Samudrik Shastra: तुमच्या कपाळावर पण इतक्या आट्या पडतात का? संख्येचा नशीब उजळण्याशी असा संबंध

Last Updated:

Samudrik Shastra: एखाद्याच्या कपाळावरील रेषा त्याच्या चेहऱ्यावरील हास्यापेक्षा त्याच्या नशिबाची कहाणी जास्त सांगतात. कपाळावरील या रेषा जीवनातील कोणते रहस्य उलगडतात आणि त्या पाहून भाग्यवान व्यक्ती कशी ओळखता येते हे आपण ज्योतिषी रवी पराशर यांच्याकडून जाणून घेऊ.

News18
News18
मुंबई : आपल्या कपाळावरील रेषा आर्थिक स्थिती, आरोग्य, नशीब आणि आयुष्यातील चढ-उतार याबद्दल बरेच काही सांगू शकतात. सामुद्रिकशास्त्रानुसार, कपाळावरील रेषांवरून, आपल्याला आपल्या स्वभावाशी आणि भविष्याशी संबंधित अनेक संकेत मिळतात. असे मानले जाते की, या रेषा तुमच्या मागील जन्मातील कर्मांशी आणि या जन्मात केलेल्या प्रयत्नांशी थेट संबंधित असतात. म्हणूनच एखाद्याच्या कपाळावरील रेषा त्याच्या चेहऱ्यावरील हास्यापेक्षा त्याच्या नशिबाची कहाणी जास्त सांगतात. कपाळावरील या रेषा जीवनातील कोणते रहस्य उलगडतात आणि त्या पाहून भाग्यवान व्यक्ती कशी ओळखता येते हे आपण ज्योतिषी रवी पराशर यांच्याकडून जाणून घेऊ.
पहिली रेषा (आटी) - पैशाची रेषा
कपाळाच्या तळाशी, भुवयांच्या अगदी वर असलेल्या रेषेला संपत्तीची रेषा म्हणतात. ही रेषा स्पष्ट, खोल आणि अखंडित असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. पण जर ही खंडित, लहान किंवा हलकी असेल तर आर्थिक समस्या वारंवार येत राहतात.
दुसरी आटी - आरोग्य रेषा
advertisement
ही आटी पैशाच्या रेषेच्या अगदी वर आढळते. ती जाड आणि स्पष्ट असेल तर व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. हलकी आणि पातळ असेल तर ती व्यक्ती सतत आजारी राहते. खंडित असेल तर त्या व्यक्तीला दीर्घकाळ आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
तिसरी आटी - नशिबाची
ही रेषा कपाळाच्या मध्यभागी आढळते. खालून मोजल्यास येणारी तिसरी आटी नशिबाची मानली जाते. ही रेषा लहान असली तरी ती व्यक्ती भाग्यवान असते. कपाळावर तीन सरळ समांतर रेषा अत्यंत भाग्यवान मानल्या जातात. अशा लोकांना आयुष्यात खूप यश आणि प्रगती मिळते.
advertisement
चौथी आटी - जीवनातील संघर्षाची
खालून तिसऱ्यारेषेनंतर दिसणारी चौथी रेषा फार कमी लोकांमध्ये आढळते. ही रेषा कपाळावर असेल तर आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. अशा व्यक्तीला २८ ते ४० वर्षे वयापर्यंत खूप संघर्ष करावा लागतो. पण, वयाच्या ४० व्या वर्षानंतर अशा लोकांना मोठे यश आणि स्थिरता मिळते.
advertisement
पाचवी आटी - चिंता आणि तणावाची
ही आटी केस सुरू होतात तिथून जवळ असते. ज्या लोकांच्या कपाळावर ही रेषा असते, त्यांना आयुष्यात कितीही यश मिळाले तरी ते नेहमीच कशा ना कशाची तरी काळजी करत राहतात. बऱ्याचदा असे लोक आयुष्यात कधीतरी संन्यासाकडे वळतात.
सहावी आटी - दैवी कृपेची
ही सर्वात दुर्मिळ रेषा मानली जाते, ती नाकापासून सरळ वर जाते, जणू टिळा लावला जातो. याला दैवी रेषा म्हणतात. अशी रेषा असलेल्या लोकांना त्यांच्या मागील जन्मातील चांगल्या कर्मांमुळे अचानक चमत्कारिक प्रगती होते आणि अचानक धनप्राप्त होते. अशा लोकांना जीवनात विशेष आदर आणि प्रतिष्ठा मिळते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Samudrik Shastra: तुमच्या कपाळावर पण इतक्या आट्या पडतात का? संख्येचा नशीब उजळण्याशी असा संबंध
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement